---Advertisement---

बाप-लेक प्रकरणामुळे बाबर आझमने क्रिडा पत्रकार झैनाब अब्बासला झाप झापले

---Advertisement---

पाकिस्तानचा प्रतिभाशाली युवा फलंदाज बाबर आझमने रविवारी(25 नोव्हेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे न्यूझीलंड विरुद्ध कसोटीमधील पहिले शतक केले आहे. या शतकानंतर त्याच्यावर सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 263 चेंडूत नाबाद 127 धावा केल्या आहेत. या नाबाद खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. यानंतर त्याचे कौतुक होत असताना मात्र पाकिस्तानची क्रिडा पत्रकार झैनाब अब्बास हीने आझमला ट्रोल केले आहे.

तिने ट्रोल करताना ट्विटमध्ये आझमला पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांचा मुलगा असे म्हटले आहे. त्यामुळे आझमनेही तिला कडक शब्दात उत्तर देताना मर्यादेत रहा असे सुनावले आहे.

झैनाब ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘बाबर आझम चांगला खेळलास. मिकी आर्थर त्यांच्या मुलाचे शतक साजरे करत असताना ज्याप्रकारे खेळाडूंनी आभिनंदन केले ते आवडले.’

यावर उत्तर देताना आझम म्हटला, ‘तू काही म्हणण्याआधी विचार कर आणि मर्यादेबाहेर जाण्याचा प्रयत्न करु नको.’

आझमने पहिले शतक साजरे केल्यानंतर त्याच्या भावना व्यक्त करताना कसोटी शतक करणे खास असल्याचे म्हटले आहे.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

सिक्युरीटी गार्डने पकडला कोहलीचा अफलातून षटकार, पहा व्हिडीओ

रोहित शर्माची नवी टी२० क्रमवारी तुम्हाला माहित आहे का?

अबब ! कसोटी क्रिकेटमध्ये आज घडला अजब कारनामा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment