पाकिस्तान क्रिकेटमधून मोठी बातमी हाती येत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडू त्यांच्या सैन्यासोबत सराव करणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार संघाने सैन्यासोबत सराव करण्यासाठी 25 मार्च ते 8 एप्रिल या तारखा निश्चित केल्या गेल्या आहेत. पीसीबीचे नवीन अध्यक मोहसिन नकवी यांनी मंगळवारी (5 मार्च) याविषयी माहिती दिली.
माध्यमांतील वृत्तांनुसार उस्लामाबादमधील एका हॉटेलमध्ये एक कार्यक्रम पार पडला. याच ठिकाणी पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी सांगितले की, खेळाडूंच्या फिटनेसमध्ये सुधार होण्यासाठी हा खास कॅम्प आयोजित केला जात आहे. इसपीएन क्रिकइंफोच्या माहितीनुसार नकवी खेळाडूंना म्हणाला, “मी लाहोरमध्ये सामना पाहत होतो. तेव्हा तुमच्यापैकी एकानेही असा षटकार मारला नाही, जो स्टॅन्ड्समध्ये गेला असेल. जेव्हा कधी असा षटकार मारला जाईल, तेव्हा मला वाटायचे की, कोणतरी विदेशी खेळाडू असेल. मी बोर्डाला अशी योजना बनवायला सांगितली आहे, ज्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या फिटनेसमध्ये वेगाने सुधारणा होईल. यासाठी योग्य ते प्रयत्न करावे लागतील.”
“आम्हाला पुढची मालिका न्यूझीलंडसोबत खेळायची आहे. त्यानंतर आयर्लंड, इंग्लंड आणि टी-20 विश्वचषक आहे. मी हा विचार केला, की सरावासाठी वेळ कधी आहे? पण वेळ नव्हता. पण तरीही आम्हाला वेळ मिळाला आहे. 25 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान खाकूल (सैन्य अकादमी) याठिकाणी एक कॅम्प अयोजित केला गेला आहे. पाकिस्तान सैन्य तुमच्या सरावात सामील होील आणि आशा आहे की, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.”
दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा पाकिस्तान क्रिकेट संघ त्यांच्या सैन्यासोबत सराव करत आहे. मिस्बाहर उल हक पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असताना देखील असा प्रयोग झाला होता. त्यानंतरच्या मालिकेत कर्णधार मिस्बाहने इंग्लंडविरुद्ध शतक ठोकले होते. शतकी खेळीनंतर त्याने सैन्यदलाला सलामी देखील ठोकली होती. पाकिस्तान क्रिकेट संघ त्यावेळी काही काळ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर देखील होता. (Babar Azam will practice with Pakistan Army! Read what is PCB’s new strategy)
मालिकेचा शेवट इंग्लंड विजयाने करणार? ‘या’ प्लेइंग इलेव्हनला घेऊन धरमशालेत उतरणार बेन स्टोक्स#benstokes #England #CricketTwitter #म #मराठी https://t.co/4NQEiFBIa4
— Maha Sports (@Maha_Sports) March 6, 2024
महत्वाच्या बातम्या –
मालिकेचा शेवट इंग्लंड विजयाने करणार? ‘या’ प्लेइंग इलेव्हनला घेऊन धरमशालेत उतरणार बेन स्टोक्स
Rohit Sharma । क्रिकेटपटू रोहित शर्मा याचे निधन, क्रीडाविश्वात शोककळा