विराट कोहली पुन्हा एकदा फलंदाजीत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs ENG) त्याला फक्त १६ धावा करता आल्या. अशाप्रकारे इंग्लंडने हा सामना १०० धावांनी जिंकून ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. अंतिम सामना १७ जुलै रोजी होणार आहे. या सामन्यात प्रथम खेळताना इंग्लंडने २४६ धावा केल्या होत्या. मोईन अलीने सर्वाधिक ४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टोपलीने केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताचा डाव अवघ्या १४६ धावांत गुंडाळला. टोपलीने या सामन्यात ६ बळी घेतले. याआधी भारताने पहिला सामना १० गडी राखून जिंकला होता.
भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सोशल मीडियावर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल मोठे विधान केला आहे. त्यांनी लिहिले की, “ही वेळही निघून जाईल, मजबूत रहा.” बाबर नुकताच श्रीलंकेत कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला असल्याची माहिती आहे. याबद्दल चाहत्यांनी बाबरचे कौतुकही केले आहे. सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावर, कोहली ५ डावात फलंदाजीसाठी उतरला आणि एकाही डावात त्याला २० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. गेल्या ३ वर्षांपासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. यामुळे कपिल देव यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्या जागी संघात युवा खेळाडूचा समावेश करण्याची मागणी करत आहेत.
This too shall pass. Stay strong. #ViratKohli pic.twitter.com/ozr7BFFgXt
— Babar Azam (@babarazam258) July 14, 2022
२० धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे
बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या ५व्या कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीने ११ धावा केल्या. दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या करण्यात तो अपयशी ठरला आणि त्याला केवळ २० धावांपर्यंतच मजल मारता आली. टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याने अनुक्रमे १ आणि ११ धावा केल्या. मात्र, भारतीय संघाने ही मालिका २-१ अशी जिंकली. दुखापतीमुळे कोहली पहिल्या वनडेत खेळू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात तो २५ चेंडूत १६ धावा करून डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीचा बळी गेला. त्याने ३ चौकार मारून चांगली सुरुवात केली. मात्र पुन्हा एकदा तो ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला बळी पडला.
टीम इंडियाला आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. या मालिकेसाठी विराट कोहलीलाही विश्रांती देण्यात आली आहे. युवा संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. कोहलीशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू युझवेंद्र चहल यांना ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात टी२० आशिया चषक प्रस्तावित आहे. येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषकही होणार आहे. येथेही पहिल्या सामन्यात दोन्ही संघ आमने सामने येतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! कर्णधार रोहितचे इंग्लिश गोलंदाजापुढे लोटांगण, ‘डक’ करत लाजिरवाण्या विक्रमात द्रविडची बरोबरी
ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबत बांधली लग्नगाठ? माजी आयपीएल अध्यक्षाने खुद्द केलाय उलगडा