पाकिस्तान- ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सिडनी कसोटी ही डेव्हिड वॉर्नर (David Warner) याच्या कारकिर्दीचा शेवटचा कसोटी सामना होता. वॉर्नरचे होम ग्राऊंड असलेल्या सिडनीत ऑस्ट्रेलियाने हा सामना 8 विकेट्सने जिंकला आणि वॉर्नरला अविस्मरणीय निरोप दिला. आपल्या शेवटच्या कसोटीत वॉर्नरने 34 आणि 57 धावांची खेळी केली. निरोपाचा सामना झाल्यानंतर पाकिस्तान संघाकडून दिग्गजाला खास भेट दिली गेली.
पाकिस्तान संघाकडून बाबर आझम (Babar Azam) याची जर्सी डेव्हिड वॉर्नर (David Warner) याला भेट केली गेली. या जर्सीवर सर्व पाकिस्तानी खेळाडूंनी आपल्या स्वाक्षऱ्या केल्या होत्या. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद याने ही जर्सी वॉर्नरला सुपूर्त केले. दरम्यान, भारतीय संघानेही काही दिवसांपूर्वी अगदी अशाच पद्धतीने डीन एल्गर याला निरोप दिला होता. केपटाऊन कसोटी ही एल्गरसाठी कारकिर्दीतील शेवटची कसोटी होती. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. सामना संपल्यानंतर विराटच्या जर्सीवर संपूर्ण भारतीय संघाने स्वाक्षरी करून एल्गरला ती भेट केली होती. अगदी याच पद्धतीने पाकिस्तान संघाकडून डेव्हिड वॉर्नरला निरोप दिला गेला.
The cricket was great, and the sportsmanship was outstanding.
Thank you for a great series @TheRealPCB 🙏 pic.twitter.com/kjxVBDb6iR
— Cricket Australia (@CricketAus) January 6, 2024
वॉर्नरच्या कसोटी कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने एकूण 112 कसोटी सामने खेळले आहेत. यात सलामीवीर फलंदाजाने खेळलेल्या 205 डावात 44.59 च्या सरासरीने तब्बल 8786 धावा केल्या आहेत. यात 26 शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. 2011 साली न्यूझीलॅंड विरूद्ध त्याने आपला पहिला कसोटी सामना खेळला होता, तर 2024मध्ये पाकिस्तानविरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला. (Babar Azam’s jersey was gifted to David Warner by Pakistan team in the farewell test match)
पाकिस्तानचा 3-0 ने उडवला धुव्वा
तिसऱ्या आणि शेवटचा कसोटी सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात पाहुण्या संघाने 313 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाला संघ पहिल्या डावात 299 मध्ये गुंडाळला गेला. दुसरा डाव सुरू होण्याआधी पाकिस्तान संघ 14 धावांनी आघाडीही होता. परंतु, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तान संघ अवघ्या 115 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी शेवटच्या डावात 130 धावांचे लक्ष्य मिळाले होते. यजमान संघाने अवघ्या 25.5 षटकांत आणि दोन विकेट्सच्या नुकसानावर हे लक्ष्य गाठले.
सिडनी कसोटीआधी ऑस्ट्रेलियाने मालिका 3-0 फरकाने जिंकत कांगारूंनी वॉर्नर ला अविस्मरणीय निरोप दिला. तत्पूर्वी मालिकेतील पिहला सामना पर्थमध्ये, तर दुसरा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला गेला. या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला अनुक्रमे 360 आणि 79 धावांनी मात दिली. पाकिस्तानला तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 3-0 असा दारून पराभव स्वीकारावा लागला.
महत्वाच्या बातम्या –
David Warner: कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यानंतर वॉर्नर भावूक, ऍशेस आणि विश्वचषकाचा उल्लेख करत म्हणाला, ‘माझ्यासाठी हे स्वप्न…’
Ranji Trophy: भाव ‘कैफ’च्या रणजी पदार्पणावर मोहम्मद शमीची भावनिक पोस्ट; म्हणाला, ‘मोठ्या संघर्षानंतर अखेर…’,