---Advertisement---

हाँगकाँगच्या खेळाडूंच्या क्रिकेटप्रती समर्थनाला सलाम, 3 महिन्यांपासून नवजात बाळाला भेटलेही नाहीत

On: बुधवार, ऑगस्ट 31, 2022 12:52 PM
hongkong
---Advertisement---

आशिया चषकातील चौथा सामना भारत विरुद्ध हाँगकाँग संघात रंगणार आहे. बुधवारी (31 ऑगस्ट) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना आयोजण्यात आला आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ सुपर-4 मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असेल. तर हाँगकाँग संघाचा हा पहिलाच सामना असल्याने त्यांचे लक्ष्य विजयी सुरुवात करण्यावर असेल.

दरम्यान हाँगकाँगच्या संघातील क्रिकेटपटूंच्या क्रिकेटप्रती समर्थनाची दखल घ्यावी लागेल. हाँगकाँगचा संघ गेल्या सलग 3 महिन्यांपासून क्रिकेट खेळत आहे. त्यातही काही खेळाडू तर नुकतेच बाप बनले असून त्यांना आणखी आपल्या नवजात बाळाची प्रत्यक्षात भेटही घेता आलेली नाही. 

हाँगकाँगचा संघ मे महिन्यापासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. परिणामी खेळाडूंकडे इतकाही वेळ नाही की, त्यांना आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाची भेट घेता येईल. हाँगकाँगचे बाबर हयात, एहसान खान आणि यासिम मुर्जता हे नुकतेच बापमाणूस बनले आहेत. परंतु क्रिकेटमुळे त्यांना फक्त व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या बाळांना पाहून समाधान मानावे लागत आहे.

हाँगकाँग संघाने गेल्या 3 महिन्यात नामिबिया, युगांडा आणि जर्सी (आयसीसी स्पर्धांसाठी) या संघांविरुद्ध दोन हात केले आहेत. तसेच दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध सराव सामनेही खेळले आहेत. टी20 विश्वचषक 2022 साठी झिम्बाब्वेविरुद्ध पात्रता फेरी सामना, ओमानविरुद्ध आशिया चषकासाठी पात्रता फेरी सामना असे भरपूर क्रिकेट खेळले आहे. यानंतर आता आशिया चषकासाठी हा संघ युएईत आहे. जिथे त्यांना साखळी फेरीत सुरुवातीला भारत आणि नंतर पाकिस्तानचा सामना करायचा आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, हाँगकाँगच्या खेळाडूंनी क्रिकेटसाठी बरेच बलिदान दिले आहे.

दरम्यान हाँगकाँग संघ 31 ऑगस्ट रोजी दुबईच्या मैदानावर भारताविरुद्ध त्यांचा पहिला सामना खेळले. त्यानंतर 2 सप्टेंबरला पाकिस्तानशी त्यांची लढत होईल. हा सामना शारजाहच्या मैदानावर खेळवला जाईल. यापैकी एकही सामना जिंकल्यात हाँगकाँगच्या सुपर-4 फेरीत पोहोचण्याच्या आशा पल्लवित होतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---