आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा अखेर संपन्न झाली आहे. ४५ सामने झाल्यानंतर क्रिकेटविश्वाला नवा विश्वविजेता संघ मिळाला आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. दोन्ही संघांना आतापर्यंत एकही जेतेपद मिळवता आले नव्हते. त्यामुळे जो संघ जिंकणार त्या संघाला इतिहास रचण्याची संधी होती. या संधीचे ऑस्ट्रेलिया संघाने सोने केले आणि पहिलेवहिले जेतेपद मिळवले. या स्पर्धेत असे काही खेळाडू होते, ज्यांनी अप्रतिम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अशातच आता आयसीसीने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम प्रदर्शन केलेल्या ११ खेळाडूंची निवड केली आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम ११ खेळाडूंमध्ये १२ व्या खेळाडूचा देखील समावेश करण्यात आला आहे. परंतु मुख्य बाब म्हणजे, भारतीय संघातील एकाही खेळाडूला यामध्ये स्थान देण्यात आले नाहीये.
आयसीसीने जाहीर केलेल्या खेळाडूंची यादी (फलंदाजी क्रमानुसार)
१) डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – २८९ धावा
२) जोस बटलर (इंग्लंड) – २६९ धावा
३) बाबर आजम, कर्णधार (पाकिस्तान) – ३०३ धावा
४) चरीथ असलांका (श्रीलंका ) – २३१ धावा
५) एडन मार्करम (दक्षिण आफ्रिका ) – १६२ धावा
६) मोईन अली (इंग्लंड )-९२ धावा आणि ७ गडी बाद
७) वानिंदू हसरंगा (श्रीलंका) – १६ गडी बाद
८) एडम झम्पा (ऑस्ट्रेलिया)- १३ गडी बाद
९) जोश हेजलवूड (ऑस्ट्रेलिया) – ११ गडी बाद
१०) ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड ) -१३ गडी बाद
११) एनरिच नॉर्किए (दक्षिण आफ्रिका) -९ गडी बाद
१२) शाहीन शाह आफ्रिदी (पाकिस्तान) – ७ गडी बाद
कुठल्याही भारतीय खेळाडूला नाही मिळाली संधी
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट संघात एकाही भारतीय खेळाडूला संधी देण्यात आली नाहीये. भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या होत्या. तर जसप्रीत बुमराहने सर्वाधिक गडी बाद केले होते. परंतु विश्वचषक स्पर्धेत त्यांना सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवता आले नाही.
🚨 Just in 🚨
The @upstox Most Valuable Team of the Tournament has been named 📋#T20WorldCup https://t.co/p0SuwdZgpS
— ICC (@ICC) November 15, 2021
भारतीय संघाला या विश्वचषक स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आली नाही. सुरुवातीच्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाला १० गडी राखून पराभूत केले होते. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८ गडी राखून पराभूत केले होते. ज्यामुळे भारतीय संघाला उपांत्यफेरीत प्रवेश करता आला नव्हता.
महत्वाच्या बातम्या –
नव्या टी२० विश्वविजेत्यांचं कौतुक! क्रिकेटविश्वातून ऑस्ट्रेलियावर शुभेच्छांचा पाऊस, पाहा ट्वीट्स
टी२० विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणारा ऑस्ट्रेलिया ६ वा संघ; पाहा आजपर्यंतच्या विजेत्यांची संपूर्ण यादी
‘देशाला अभिमान वाटावा यासाठी परिश्रम करत राहील’, अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर शिखर धवन झाला व्यक्त