टी20 विश्वचषक 2024 चा सुपर 8 सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या आहेत. आता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 149 धावांचं आव्हान आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यानं इतिहास रचला. त्यानं या विश्वचषकातील आपली सलग दुसरी हॅट्ट्रिक घेतली आहे. त्यानं बांगलादेशविरुद्ध सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात सलग 3 चेंडूवर 3 विकेट घेतल्या होत्या. आता कमिन्सनं अफगाणिस्तानविरुद्ध देखील ही कामगिरी करून दाखवली आहे. अशाप्रकारे पॅट कमिन्स टी20 विश्वचषकाच्या इतिहासात दोन हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरलाय.
या सामन्यात कमिन्सनं 4 षटकांत 28 धावा देत 3 विकेट घेतल्या. यासह त्यानं टी20 विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
टी20 विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानं घेतली होती. 2007 मध्ये केपटाऊनमध्ये बांगलादेशविरुद्ध त्यानं ही कामगिरी केली होती. पॅट कमिन्स आणि ब्रेट ली यांच्याशिवाय आणखी पाच गोलंदाजांनी टी20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेतल्या आहेत. कर्टिस कॅम्फर, वानिंदू हसरंगा आणि कागिसो रबाडा यांनी 2021 मध्ये, तर कार्तिक मयप्पन आणि जोशुआ लिटल यांनी 2022 मध्ये ही कामगिरी केली आहे.
टी20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारे गोलंदाज
ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, केप टाउन, 2007
कर्टिस कॅम्फर (आयर्लंड) विरुद्ध नेदरलँड्स, अबू धाबी, 2021
वानिंदू हसरंगा (श्रीलंका) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह, 2021
कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड, शारजाह, 2021
कार्तिक मयप्पन (यूएई) विरुद्ध श्रीलंका, गिलॉन्ग, 2022
जोशुआ लिटल (आयर्लंड) विरुद्ध न्यूझीलंड, ॲडलेड, 2022
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, 2024
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध अफगाणिस्तान, किंग्सटाउन, 2024*
टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये हॅट्ट्रिक घेणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज
ब्रेट ली विरुद्ध बांगलादेश, केप टाउन, 2007
ॲश्टन आगर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2020
नॅथन एलिस विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, 2021
पॅट कमिन्स विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, 2024
पॅट कमिन्स विरुद्ध अफगाणिस्तान, किंग्सटाउन, 2024*
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक-कुलदीपच्या झंझावातात बांगलादेश उडाला! टीम इंडियाचं सेमीफायनलमधील स्थान जवळपास पक्कं
नाद करा पण कोहलीचा कुठं! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज
हार्दिक पांड्याचं विस्फोटक अर्धशतक! भारताचं बांग्लादेशसमोर 197 धावांचं आव्हानं