---Advertisement---

इंडोनेशिया बॅडमिंटन ओपन स्पर्धेतून भारताचे आव्हान संपुष्टात

---Advertisement---

जकार्ता | इंडोनेशिया ओपन स्पर्धेत भारताला 6जुलैला दुहेरी झटका बसला. महिला एकेरीत पीव्ही सिंधू तर पुरुष एकेरीत एचएस प्रणय यांचा उपांत्य पूर्व फेरीत पराभव झाला. 

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताच्या पी व्ही सिंधूला चीनच्या ही बिंगजियाओ कडून  21-14, 21-15 असा पराभव स्विकारावा लागला.

चीनच्या बॅडमिंटनपटूंकडून 11 सामन्यातील पीव्ही सिंधूचा हा सहावा पराभव होता.

याबरोबरच पुरुष ऐकेरीत भारताच्या एचएस प्रणॉयचा ऑल इंग्लैंड बॅटमिंटन स्पर्धेचा विजेता शी युकी ने 21-17, 21-18 असा पराभव केला.

त्यामुळे भारताचे इंडोनेशिया बॅडमिंटन ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

या स्पर्धेतून सायना नेहवाल आणि इंडोनेशिया बॅडमिंटन ओपनचा गतविजेता किदांबी श्रीकांत हे दिग्गज यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-तब्बल सहा महिन्यानंतर मोहम्मद शमीच्या आयुष्यात चांगली घटना

-भुवनेश्वर-कुलदीप हे वागणं बरं नव्हे; इंग्लंडचा क्रिकेटपटू कडाडला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment