---Advertisement---

टोकिया ऑलिंपिकमध्ये उतरण्यापूर्वी पीव्ही सिंधूला आई- वडिलांकडून मिळाले खास सरप्राईज; एकदा पाहाच

---Advertisement---

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू या वेळी टोकियो ऑलिम्पिकमधील मागील वर्षी प्रमाणेच या ही वर्षी पुन्हा एकदा यश मिळवण्याचा प्रयत्न करेल. रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती आणि विद्यमान विश्वविजेत्या सिंधूचे यावेळी संपूर्ण लक्ष सुवर्ण पदकाकडे आहे. त्याचबरोबर भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनीही सिंधूला यावेळी सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार म्हटले आहे. सिंधूला टोकियोमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात इस्त्रायली खेळाडू पोलिकार्पोवा सेनिया विरूद्ध सुरू करायची आहे. या सामन्याआधी सिंधूला आई- वडिलांकडून एक खास सरप्राईज मिळालं आणि ते सोशल मीडियावर शेअर केलं.

सिंधूनेे आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पुढे तिचे आई आणि वडील ऑलिम्पिकमध्ये यश संपादन करण्यासाठी तिचे अभिनंदन करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून सिंधू खूप खुश दिसत आहे.

तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही माझ्या प्रत्येक प्रवासामध्ये नेहमीच स्थिर आहात तुमची जागा कोनीही घेऊ शकत नाही. ही माझी सपोर्ट सिस्टिम आहे, जी नेहमीच मला पुढे ढकलते, समर्थन करते आणि प्रेरणा देत असते. मी माझ्या कुटुंबाची खूप आभारी आहे आणि या प्रेमळ सरप्राईजसाठी ऑलिम्पिक चॅनेलचे आभार.’

https://www.instagram.com/p/CRlCTVTBYdo/?utm_source=ig_web_copy_link

सिंधू रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकापासून अवघी एक पाऊल दूर होती. सिंधूला ऑलिम्पिकमध्ये या वेळी सहज ड्रॉ मिळाला आहे आणि तिला गट जेमध्ये स्थान देण्यात आले आहे. यावेळी स्टार बॅडमिंटनपटूला सहावे मानांकन मिळाले आहे. हाँगकाँगच्या चेउंग एनगानलाही या गटात जागा मिळाली आहे. एनगान 34 व्या, तर पोलिकार्पोवा 58 व्या क्रमांकावर आहे. सिंधू ही बॅडमिंटन खेळात ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारतीय इतिहासातील दुसरी खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-केएल राहुलच्या ‘त्या’ कृतीतून दिसले देशप्रेम, चाहत्यांनी केले कौतुक, पाहा व्हिडिओ

-हार्टब्रेक! शुबमन गिल परतला भारतात; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून दुर्दैवीरीत्या व्हावे लागले बाहेर, पाहा फोटो

-आणखी काय हवं! सराव सामन्यात शतक झळकावताच ‘त्याची’ इंग्लंड संघात झाली निवड; ५ वर्षांनंतर पुनरागमनाची संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---