---Advertisement---

WIvENG| लाजिरवाण्या सुरुवातीनंतर बेअरस्टोची शतकी झुंज; पहिल्या दिवसाअखेर इंग्लंड ६ बाद २६८

On: बुधवार, मार्च 9, 2022 4:07 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना (WIvENG) मंगळवारी (८ मार्च) अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही मालिका ‘रिचर्ड्स-बॉथम ट्रॉफी’ या नावाने खेळवली जात आहे. इंग्लिश कर्णधार जो रुटने घेतलेला फलंदाजीचा निर्णय यजमान संघाच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. इंग्लंडची वरची फळी कापून काढत त्यांनी दमदार सुरुवात केली. मात्र, अनुभवी जॉनी बेअरस्टो शतक झळकावून नाबाद राहिल्याने पहिल्या दिवसाचा खेळ समान पारड्यात राहिला.

वेस्ट इंडीजची धारदार गोलंदाजी

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आल्यावर वेस्ट इंडीजच्या अनुभवी गोलंदाजांनी इंग्लंड संघाला सुरुवातीपासून बॅकफूटवर ठेवले. केमार रोच याने पदार्पण करणाऱ्या ऍलेक्स लीज याला केवळ चार धावा नंबर तंबूत पाठवले. त्यानंतर, जेडन सिल्सने झॅक क्राऊली याला केवळ ८ धावांवर माघारी पाठवले. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तो १३ धावांवर रोचचा शिकार ठरला. जेसन होल्डर याने लॉरेन्सला बाद करून पाहुण्यांची अवस्था ४ बाद ४८ अशी दयनीय केली होती.

बेअरस्टोची झुंज

पहिले चार गडी केवळ पन्नास धावांत माघारी परतल्यानंतर अनुभवी फलंदाज जॉनी बेअरस्टो व अष्टपैलू बेन स्टोक्स यांनी डाव सावरला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ६७ धावा जोडल्या. स्टोक्स ३६ धावा काढून बाद झाल्यानंतर,‌ यष्टीरक्षक बेन फोक्सने ४२ धावांचे योगदान दिले. बेअरस्टो व फोक्स जोडीने सहाव्या गड्यासाठी ९९ धावांची भागीदारी केली. यादरम्यान बेअरस्टोने शतक साजरे केले. पहिल्या दिवसाचा संपेपर्यंत इंग्लंड संघाने ६ बाद २६८ धावा केल्या होत्या. बेअरस्टो १०८ तर वोक्स २४ धावा काढून नाबाद आहेत. वेस्ट इंडीजसाठी रोच, होल्डर व जेडेन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

महत्वाच्या बातम्या-

हरभजन की अश्विन, कोणाची गोलंदाजी सर्वात जास्त घातक? दिग्गज फलंदाजाने दिले उत्तर (mahasports.in)

विश्वचषक २०११ मधील पाकिस्तानविरुद्धच्या सेमी फायनलपूर्वी विराटला होत्या असह्य वेदना, तरीही उतरला होता मैदानात (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---