पॅरिस: जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून फ्रान्स देशातील पॅरिस येथे सुरुवात होत आहे. भारताचे तब्बल २४ खेळाडू वेगवेगळ्या गटातून यावेळी आपले नशीब अजमावत आहेत. परंतु ६५ किलो पुरुषांच्या फ्रीस्टाइल गटात खेळत असलेल्या बजरंग पुनियावर सर्वांचे लक्ष आहे.
आजपर्यंत भारताकडून ११ खेळाडूंनी जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदं मिळवली आहेत. परंतु प्रत्येकाने एकदाच येथे विजेतेपद मिळवले आहे. जर बजरंग पुनियाने येथे कोणतंही पदक जिंकल तर २ पदके जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनणार आहे.
२०१३ साली बुडापेस्ट, हंगेरी येथे झालेल्या स्पर्धेत बजरंगला कांस्यपदक मिळाले होते. भारताकडून यावेळी कोणतीही पदक विजेती कामगिरी केली तरी हा एक मोठा विक्रम असणार आहे.
कोण आहे बजरंग पुनिया
वय-२३
गट- पुरुषांच्या फ्रीस्टाइलमध्ये ६५ किलो
आजपर्यंतची कामगिरी:
२०१३- बुडापेस्ट जागतिक स्पर्धेत ६० किलो गटात ब्राँझपदक
२०१४- ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत ६१ किलो गटात रौप्यपदक
२०१४- इंचॉन एशियाडमध्ये ६१ किलो गटात रौप्यपदक
२०१७- नवी दिल्लीत झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ६५ किलो गटात सुवर्णपदक