---Advertisement---

“ज्यांना पदक हवंय त्यांनी 15 रुपयांत…”, विनेशची याचिका सीएएसने फेटाळल्यानंतर बजरंग पुनियाची पोस्ट

On: गुरूवार, ऑगस्ट 15, 2024 8:40 PM
Vinesh Phogat, bajarang Punia
---Advertisement---

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) हिच्या पदरी अखेर निराशाच पडली आहे. विनेशची अपील सीएएसने (CAS) फेटाळली असून आता तिला रौप्य पदक मिळणार नाही. विनेशला अंतिम सामन्याच्या दिवशी निर्धारित वजनापेक्षा 100 ग्रॅम जास्त वजन भरल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympic) अपात्र ठरवण्यात आलं होतं. यानंतर विनेशने स्वत:चा एक भावनिक फोटो पोस्ट केला होता. याबाबत आता भारताचा ऑलिम्पिक विजेता बजरंग पुनियाने भाष्य केले आहे.

सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी विनेशला अपात्र घोषित करण्यात आले होते. 50 किलो वजनी गटातून तिचे वजन फक्त 100 ग्रॅम जास्त भरले होते. विनेशचे रौप्यपदक निश्चित होते. यानंतर विनेशने सीएएसकडे रौप्यपदकासाठी अपील केले होते. मात्र या निर्णयाची तारीख पुन्हा पुन्हा पुढे ढकलण्यात आली. मात्र, अखेर बुधवारी (14 ऑगस्ट) निर्णय झाला. सीएएसने विनेशचे अपील फेटाळले. यानंतर विनेशला रौप्य पदक मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत बजरंगने पोस्ट करत निराशा व्यक्त केली. त्याने लिहिले, ‘या अंधारात तुझ्याकडून पदक हिरावलं गेल असेल, पण तू संपूर्ण जगात हिऱ्याप्रमाणे चमकत आहेस. विश्वविजेत्या भारताची शान रुस्तम-ए-हिंद विनेश फोगट, तू देशाची कोहिनूर आहेस. संपूर्ण जगात तुझं नाव गुंजत आहे. ज्यांना पदके हवी आहेत त्यांनी 15-15 रुपयांना विकत घ्या.’

हेही वाचा-

सीएएसने अपील फेटाळल्यानंतर विनेश फोगटची पहिली पोस्ट, फोटो पाहून तुमचेही हृदय तुटेल

आयपीएलमधून ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटणार? बीसीसीआय सचिव जय शहांची मोठी प्रतिक्रिया
काय सांगता.! आयपीएल संघाच्या प्रशिक्षकांची चक्क इतक्या रुपयांची कमाई, पाहा सर्वात महागडा कोण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---