पुणे। डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 20व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत भारताच्या शर्मदा बाळू, ईश्वरी माथेरे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत शानदार सुरुवात केली.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत शर्मदा बाळू हिने जपानच्या पाचव्या मानांकित साकी इमामुराचा 6-3, 6-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या ईश्वरी माथेरेने अमेरिकेच्या पंधराव्या मानांकित श्रीया अत्तुरूला 6-1,6-2 असे पराभूत केले. भारताच्या निधी चिलूमुल्लाने एसपीजीच्या सारा पांगचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. सोहा सादिक हिने स्म्रिती भासिनचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव केला. रम्या नटराजन हिने प्रतिभा नारायण प्रसादचे आव्हान 6-2, 6-1 असे मोडीत काढले. चौथ्या मानांकित समा सात्विकाने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या इरा शहाचा 6-2, 6-0 असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली.
सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: महिला: एकेरी:
क्लॅरा वाल्सलियर(बेलारूस)[1] वि.वि.बेला ताम्हणकर(भारत) 6-0, 6-1;
वेरोनिका बसझाक(पोलंड)[6] वि.वि.समीक्षा श्रॉफ(भारत)6-1, 6-1;
रम्या नटराजन(भारत)[10] वि.वि.प्रतिभा नारायण प्रसाद(भारत)6-2, 6-1;
जेनिफर लुईखेम(भारत)[2] वि.वि.सोनाशे भटनागर(भारत) 6-2, 6-1;
ईश्वरी माथेरे(भारत)वि.वि.श्रीया अत्तुरू(यूएसए)[15] 6-1,6-2;
निधी चिलूमुल्ला(भारत)[11]वि.वि.सारा पांग(एसजीपी) 6-0, 6-1;
सो-रा ली(कोरिया)[3] वि.वि.साई देदीप्प्या येडुला(भारत)6-1, 6-0;
समा सात्विका(भारत)[4] वि.वि.इरा शहा(भारत) 6-2, 6-0;
आरती मुनियन(भारत)[16]वि.वि.याशिका वेणू(भारत)6-2, 6-4;
एलेना जमशिदी(डेन्मार्क)[8] वि.वि.ऋतुजा चाफेकर(यूएसए) 7-5, 6-1;
शर्मदा बाळू(भारत)वि.वि.साकी इमामुरा(जपान)[5] 6-3, 6-1;
सोहा सादिक(भारत)[9]वि.वि.स्म्रिती भासिन(भारत)7-6(5), 6-3;
श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती(भारत)[7] वि.वि.पुजा इंगळे(भारत) 6-1, 6-3;
हुमेरा बहारामूस(भारत)[12]वि.वि.निदीत्रा राजमोहन(भारत)6-1, 6-2;
श्रेया तातावर्ती(भारत)[13]वि.वि.आलिया इब्राहिम(भारत) 6-3, 6-0.
महत्त्वाच्या बातम्या –
पीवायसी-पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग २०२१ स्पर्धेत आर्यन स्कायलार्कस संघाला विजेतेपद