शनिवारी (दि. 10 डिसेंबर) चट्टोग्राम येथे बांगलादेश विरुद्ध भारत संघात तिसरा वनडे सामना खेळला गेला. पहिले दोन सामने जिंकत विजयी आघाडी घेणाऱ्या बांगलादेशला भारतीय संघाने तिसऱ्या वनडेत धूळ चारली. या सामन्यात भारताच्या ईशान किशनने द्विशतक आणि विराट कोहलीने शतक ठोकले. यादरम्यान किशनने द्विशतक ठोकल्यानंतर विराट कोहलीने बॅट हवेत उचलत भांगडा डान्स केला. यादरम्यानचा व्हिडिओ भलताच व्हायरल होत असून तो चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.
विशेष म्हणजे, हे ईशान किशन (Ishan Kishan) याने विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी 290 धावांची भागीदारी रचली होती. किशनने 131 चेंडूत 10 षटकार आणि 24 चौकारांच्या मदतीने 210 धावांची खेळी केली. हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील पहिले द्विशतक होते. दुसरीकडे, विराटनेही या सामन्यात 91 चेंडूत 113 धावांची खेळी साकारली. यामध्ये 2 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता.
विराट कोहली आणि ईशान किशन डान्स
खरं तर, जेव्हा ईशानने त्याचे द्विशतक ठोकले, तेव्हा विराट कोहलीचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने खेळपट्टीवरच भांगडा करण्यास सुरुवात केली. विराटचा भांगडा डान्स करण्याचा अंदाज त्याच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. विराटला भांगडा करताना पाहून ईशानही त्याचा डान्स कॉपी करताना दिसतो. ईशानच्या दुसऱ्या शतकावर विराटचे बॅट हवेत उचलून भांगडा करणे चाहत्यांची मने जिंकत आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ शेअर करत चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
भारताचा चौथा द्विशतकवीर
ईशानबद्दल बोलायचं झालं, तर तो द्विशतक झळकावणारा भारताचा चौथा खेळाडू बनला आहे. त्याच्यापूर्वी अशी कामगिरी सचिन तेंडुलककर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा या धुरंधरांनी केली होती. रोहितने वनडेत 3 द्विशतके झळकावली आहेत.
विराटचे 72वे आंतरराष्ट्रीय शतक
याव्यतिरिक्त विराटनेही त्याच्या वनडे कारकीर्दीतील 44वे शतक ठोकले. तसेच, हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 72वे शतक होते. आता विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके मारणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके मारण्याचा विक्रम आहे. सचिनने 100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. (ban vs ind 3rd odi virat kohli celebrates ishan kishan double century moment with dance moves see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटची खतरनाक आकडेवारी! भारताने जेव्हाही 300 धावांचा आकडा पार केलाय, तेव्हा-तेव्हा कोहली चमकलाय
ईशान किशन वर्षाला कमवतोय ‘एवढे’ कोटी, त्याबरोबर कोटींच्या गाड्या आहेत घरात






