क्रिकेटमध्ये अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाते. काही वेळा एका खेळाडूमुळे इतर खेळाडूंचा वेळही वाया जातो. अशात त्यांची रिऍक्शन पाहण्यासारखी असते. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. सध्या बांगलादेश विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. यामधील भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराट यजमानांच्या फलंदाजावर आगपाखड करताना दिसत आहे. पण विराट फलंदाजावर चिडला तरी का? चला जाणून घेऊया…
झाले असे की, शेर ए बांगला स्टेडिअमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात ही घटना घडली. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला बांगलादेशचे सलामीवीर नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) नॉनस्ट्रायकर एन्डवर त्याच्या बुटांची लेस बांधत होता. यादरम्यान डगआऊटमधून खेळाडू ड्रिंक्स घेऊन मैदानावर पोहोचले. त्यावेळी तिसऱ्या सत्रातील 6 षटकांचा खेळ खेळून झाला होता. ग्राऊंडवरील प्रकाश हळूहळू कमी होत होता. खराब प्रकाशाआधी खेळ थांबवण्यापूर्वी आणखी काही षटकांचा खेळ व्हावा असे विराटला वाटत होते. अशा वेळी त्याला वाटले की, फलंदाज वेळ वाया घालवतोय. त्यावेळी विराट शांतोला डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसला. व्हिडिओ पाहून दिसते की, विराट शांतोला शर्ट काढण्याचा इशारा करत आहे. विराट असे म्हणाला की, “शर्ट भी खोल ले.” म्हणजेच विराट त्याला तू आता शर्टही काढ, असे म्हणताना दिसला.
नजमुल 5 धावांवर नाबाद परतला
काही वेळेनंतर पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. यजमान बांगलादेश संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपवत दुसऱ्या डावात कोणतीही विकेट न गमावता 7 धावा केल्या होत्या. शांतोने यावेळी नाबाद 5, तर जाकिर हसन याने नाबाद 2 धावा केल्या होत्या.
विराट कोहली 24 धावांवर बाद
दुसरीकडे, भारताचा पहिला डाव 314 धावांवर संपुष्टात आला. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने सर्वाधिक 93 धावांची खेळी केली. तसेच, श्रेयस अय्यर याने 87 धावांचे योगदान दिले. पंत आणि अय्यर यांनी पाचव्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी रचली. यावेळी विराट 73 चेंडूत 24 धावांवर तंबूत परतला. यावेळी बांगलादेशकडून गोलंदाजी करताना शाकिब अल हसन आणि तैजूल इस्लाम यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. (ban vs ind virat kohli says to najmul hossain shanto apna shirt bhi khol le see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कपड्यांप्रमाणे संघ बदलणारा ‘हा’ खेळाडू दिल्लीच्या गोटात, आयपीएलमध्ये झळकावून बसलाय शतक
तिसऱ्या दिवशी भारताची जबरदस्त सुरूवात, सिराज-अश्विनने दिले यजमानांना पाठोपाठ धक्के





