बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. उभय संघातील पहिला कसोटी सामना रविवारी (१५ मे) सुरू झाला. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत ३९७ धावा केल्या. यादरम्यान श्रीलंकेचा दिग्गज अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजचे द्विशतक अवघी एक धाव कमी पडल्यामुळे हुकले. महत्वाची आणि मोठी खेळी करून देखील मॅथ्यूजच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत असे अनेक खेळाडू होऊन गेले आहेत, ज्यांनी शतकाला एक धाव कमी असताना म्हणजेच ९९ धावांवर विकेट गमावली आहे. तसेच यापूर्वी १२ खेळाडू असे झाले आहेत, ज्यांनी १९९ धावा करून विकेट गमावली आहे. तर मार्टिन क्रो हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने वैयक्तिक २९९ धावांवर विकेट गमावली आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अँजेलो मॅथ्यूजने मात्र आजपर्यंत न घडलेली कामगिरी केली आहे.
कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अंजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) ३९७ चेंडूत वैयक्तिक १९९ धावा करून बाद झाला. यापूर्वी २००९ साली मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारताविरुद्धच्या एका सामन्यात मॅथ्यूज ९९ धावा करून बाद झाला होता. याच पार्श्वभूमीवर मॅथ्यूज कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला असा खेळाडू बनला आहे, जो वैयक्तिक ९९ आणि १९९ धावांवर बाद झाला आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूच्या नावावर झाला नव्हता. तसेच हा नकोसा विक्रम नावावर करण्याची इच्छाही कोणत्या खेळाडूची नसावी.
💔 Angelo Mathews misses out on his well deserved double century just by one run!
SL 397 all out (A Mathews 199, D Chandimal 66, K Mendis 54 : Nayeem 6/105, Shakib 3/60)#BANvSL pic.twitter.com/6EO0ctu0mF
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) May 16, 2022
सामन्याचा विचार केला, तर दुसऱ्या दिवशी बांगलादेशला फलंदाजीची संधी मिळाली. श्रीलंकेचा संघ दुसऱ्या दिवशी चाहापाणानंतर ३९७ धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावात श्रीलंकेसाठी मॅथ्यूजव्यतिरिक्त दिनेश चंदीमलने ६६, तर कुसल मेंडिसने ५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने एकही विकेट न गमावता ७६ धावा केल्या.
दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे मुदस्सर नजर हे १९९ धावांवर बाद हाणाऱ्या पहिले खेळाडू आहेत, ज्यांना १९८४ साली भारताविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये १९९ धावांवर बाद होणाऱ्या भारतीयांचा विचार केला, तर मोहम्मद अजहरुद्दीन आणि केएल राहुलने हा नकोसा विक्रम केला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
क्रिजच्या एकाच बाजूला दोन्हीही फलंदाज, अश्विनच्या चुकीमुळे नीशमला पकडावा लागला पव्हेलियनचा रस्ता
आयपीएलचा स्पीडस्टार उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळणे निश्चित! ‘हे’ २ युवाही ओळीत