आयपीएल 2025 चा 28 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे. राजस्थानच्या होम ग्राउंडवर 18 व्या हंगामातील हा पहिलाच सामना असेल. राजस्थान संघ संजू सॅमसन तर, बंगळुरू संघ रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहेत. बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व राजस्थानला फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे.
या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सने 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 जिंकले आहेत.सलग 2 विजयांनंतर, संजू सॅमसन आणि संघाने मागील सामना गमावला. त्याच वेळी, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने 3 सामने जिंकले आहेत आणि 5 पैकी 2 सामने गमावले आहेत.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन –
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा , टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, यश दयाल






