---Advertisement---

दिग्गज खेळाडू आशिया चषकापूर्वी संघातून पडला बाहेर, सर्वत्र उडाली खळबळ

Liton Das
---Advertisement---

अशिया चषक 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरवात होणार आहे. अगदी तोंडावर आलेल्या अशिया चषाकापूर्वी बांगलादेश संघाची समस्या वाढली आहे. बांगलादेश संघाचा स्टार फलंदाज लिटन दास स्पर्धेबाहेर आहे. यष्टिरक्षक फलंदाज लिटन सध्या आजारी आहे. याच कारणामुळे तो अद्याप संघात सहभागी होऊ शकलेला नाही. लिटनला जूनही पहिल्या सामन्यासाठी श्रीलंकेत पोहचता आलेले नाही. याच कारणामुळे तो या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. लिटनच्या अनुपस्थितीत अनामूल हकचा संघात समावेश करण्यात आला आहे.

लिटन दास (Liton Das) बांगलादेशच्या सर्वोत्तम खेळाडूंनपैकी एक आहे. त्याने संघासाठी सतत चांगली कामगिरी केली आहे. बांगलादेशच्या फलंदाजाने आतापर्यंत 72 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळून 2213 धावा केल्या आहेत. यादरम्यन त्याने 5 शतक आणि 10 अर्धशतके ठोकली आहे. लिटनची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या 176धावा आहे. आशिया चषकापूर्वी तो विषाणूजन्य तापाला बळी पडला असून अद्याप तो पूर्णपणे बरा झालेला नाही. याच कारणामुळे तो आशिया चषकमधून बाहेर पडला आहे.

लिटनच्या अनुपस्थितीत बांगलादेशने अनामूल हकला संघात स्थान दिले आहे. यष्टिरक्षक फलंदाज अनामुलने आतापर्यंत 44 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 1254 धावा करत 3 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. त्याची वनडे सर्वोत्तम धावसंख्या 120 धावा आहे. अनामूलने 20 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 445 धावा केल्या आहेत. डिसेंबर 2022 मध्ये त्याने संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो संघाबाहेर होता. मात्र आता त्याचे संघात पुनरागमन झाले आहे अता तो मिळालेल्या संधीच सोन करतो की नाही हे पाहणे उस्तुकतेचे असेल.

आशिया चषक 2023 बांगलादेश संघाची अंतिम यादी-
शकीब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन ध्रुबो, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल अहमद, महेद हसन, नसुम अहमद , नईम शेख, शमीम हुसेन, तन्झीद हसन तमीम, तन्झीम हसन साकीब, अनामुल हक बिजॉय (bangladesh batsman liton das ruled out of asia cup 2023)

महत्वाच्या बातम्या-  
अशिया चषक 2023च्या हायब्रिड मॉडेलवर बाबरची नाराजी, म्हणाला बरं झाल असत… 
सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! पाकिस्तानविरुद्ध विराटसाठी चालून आली मोठी संधी, लगेच वाचा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---