Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बांगलादेशकडून पुन्हा इंग्लंडला ‘दे धक्का’! वनडेपाठोपाठ पहिल्या टी20 मध्येही विश्वविजेत्यांचा नामुष्कीजनक पराभव

March 9, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


सध्या इंग्लंड क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. वनडे मालिकेत 2-1 असा विजय संपादन केल्यानंतर गुरूवारी (9 मार्च) उभय संघांमध्ये टी20 मालिका सुरू झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान बांगलादेशने विश्वविजेत्या इंग्लंडला पराभवाचा धक्का देत 6 गडी राखून विजय संपादन केला. यासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मधल्या फळीतील फलंदाज शांतो बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

Bangladesh register a win against England in only the second T20I between the sides 💥#BANvENG | https://t.co/oJUpcT6iXU pic.twitter.com/equnNysNQQ

— ICC (@ICC) March 9, 2023

चट्टोग्राम येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडला कर्णधार जोस बटलर व फिल सॉल्ट यांनी 10 षटकात 80 धावांची सलामी दिली. सॉल्टने 35 चेंडूंवर 38 धावा केल्या. तर, बटलरने 42 चेंडूत 67 धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजीचा नमुना सादर केला. बेन डकेट वगळता इंग्लंडच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. परिणामी, इंग्लंड आपल्या निर्धारित 20 षटकात 6 बाद 156 अशी मजल मारू शकला.

फलंदाजीला पोषक असलेल्या या खेळपट्टीवर ही धावसंख्या बांगलादेशसाठी फारशी मोठी नव्हती. मात्र, त्यांनी आपले तीन फलंदाज 33 धावांत गमावले. त्यानंतर शांतो व कर्णधार शाकिबने 65 धावांची भागीदारी केली. शांतोने 30 चेंडूवर 51 धावांची भागीदारी केली. शाकिबने नाबाद 34 व हुसेनने नाबाद 15 धावा करत संघाला सहा गडी राखून विजय मिळवून दिला. शांतो याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

(Bangladesh Beat World Champion England In First T20I By 6 Wickets)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

स्टीव्ह ‘फेल’ स्मिथ! चांगल्या सुरवातीनंतरही संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरलाय ऑसी कर्णधार
स्टीव्ह ‘फेल’ स्मिथ! चांगल्या सुरवातीनंतरही संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरलाय ऑसी कर्णधार


Next Post
Photo Courtesy: Twitter/Cricket Australia

"मला आऊट व्हायचे नव्हते", दमदार शतकानंतर ख्वाजाने सांगितला आपला गेमप्लॅन

Hamid Hassan

अफगाणिस्तानी दिग्गजाने घेतली निवृत्ती, मिळाली राष्ट्रीय संघाची सेवा करण्याची संधी

Usman Khawaja

मागच्या 10 वर्षीत एकट्या ख्वाजाने भारतात केली 'अशी' कामगिरी, केली श्रीलंकन दिग्गजाची बरोबरी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143