बागंलादेशनं पहिल्याच कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर त्यांना धूळ चारली. त्यावर आता बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसन शांतोनं (Najmul Hossain Shanto) रविवारी (25 ऑगस्ट) आपल्या संघाचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी विजय देशातील सध्याच्या परिस्थितीत ‘विशेष’ असल्याचं म्हटलं आहे. बांगलादेशनं 10 गडी राखून पाकिस्तानला धूळ चारली.
पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत नजमुल हुसन शांतो (Najmul Hossain Shanto) म्हणाला, “आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा विजय आहे. कारण गेल्या महिन्यात बांगलादेशमध्ये आमच्यासाठी कठीण परिस्थिती होती. तिथं अजूनही काही समस्या आहेत, परंतु बांगलादेशमध्ये आम्ही एकमेकांना साथ देतो आणि मला आनंद आहे की या विजयामुळे त्यांच्या चेहऱ्यावर थोडे हसू आले असेल.”
पुढे बोलताना शांतो म्हणाला, “आम्ही आमच्या कामगिरीवर खूश आहोत आणि दुसऱ्या सामन्यातही आम्हाला आमच्या लोकांना आणखी आनंद द्यायचा आहे. आमच्यासाठी हा विशेष विजय होता. विशेषत: आम्ही येथील कठीण परिस्थिती आणि खेळपट्टीशी कसे जुळवून घेतले याचा विचार केला. मला वाटतं परिस्थितीचा विचार करता शाकीब आणि मिराजनं चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला माहित होतं की 90 धावांची आघाडी घेतल्यानं पाकिस्तान शेवटच्या दिवशी दडपणाखाली असेल.”
नजमुल हुसेन शांतोच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं 28 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 28.78च्या सरासरीनं 1,497 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 51.51 आहे. कसोटीमध्ये त्यानं 3 अर्धशतकं आणि 5 शतकं झळकावली आहेत. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 163 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिकच्या ‘त्या’ वागण्यामुळे नताशाला अस्वस्थ वाटू लागले होते; दोघांमधील घटस्फोटामागचे कारण आले समोर!
बांगलादेशनं दिला पाकिस्तानला झटका, WTCच्या गुणतालिकेत घेतली झेप
अंपायरच्या निर्णयावर नाराज फलंदाजाने जोराने फेकले हेल्मेट, थोडक्यात बचावला खेळाडू – video