---Advertisement---

आशिया चषकात बांगलादेशला तारण्यासाठी श्रीराम मैदानात!

On: शुक्रवार, ऑगस्ट 19, 2022 3:13 PM
---Advertisement---

बांगलादेश क्रिकेट संघ सध्या काहीशा वाईट काळातून जात आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यावर त्यांना नामुष्कीजनक पराभव पत्करावे लागले. वनडे व टी२० मालिकांमध्ये त्यांना झिम्बाब्वेने मात दिली. आता या सर्व घटनाक्रमानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी आशिया चषक व टी२० विश्वचषकासाठी त्यांनी आपल्या टी२० संघाचे मुख्य प्रशिक्षक बदलले आहेत.

झिम्बाब्वेसारख्या क्रमवारीत खाली असलेल्या संघाकडून सलग दोन मालिकांमध्ये पराभूत झाल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. संघाला पुढील दोन महिन्याच्या काळात दोन मोठ्या टी२० स्पर्धा खेळायच्या आहेत. त्यामुळे टी२० संघाला नवे प्रशिक्षक देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला. त्यानुसार भारताचे माजी क्रिकेटपटू श्रीधरन श्रीराम यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीराम यांनी २०२२ पासून सहा वर्षे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच इंडियन प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स व पंजाब किंग्सच्या कोचिंग स्टाफमध्येही त्याचा समावेश होता. श्रीराम यांनी २०००-२००४ दरम्यान भारतीय क्रिकेट संघासाठी आठ एकदिवसीय सामने खेळले होते.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमूल हसन यांनी काही दिवसांपूर्वीच संघ व्यवस्थापनात काहीतरी कठोर बदल होणार असल्याचे संकेत दिले होते. श्रीराम हे केवळ टी२० संघाला मार्गदर्शन करतील. रसेल डोमिंगो हे वनडे व कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम आहेत. २७ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या आशिया चषकात तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ‌‌टी२० विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याचे आव्हान बांगलादेश संघासमोर असणार आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

बुड्ढे में है दम! अँडरसनने वयाच्या चाळीसीत मोडला ११० वर्ष जूना विक्रम, नावे केला वर्ल्ड रेकॉर्ड

एकेवेळी १० पेग पिऊन शतक ठोकणारा कांबळी आता नोकरीसाठी दारुही सोडायला तयार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---