गणेश चतुर्थीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी अनेक क्रिकेटपटूंच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. केवळ भारतातच नव्हे तर विदेशात देखील हा सण साजरा केला जातो. विदेशात राहणारे हिंदू लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.
बांगलादेशचा क्रिकेटपटू लिटन दास यानं देखील गणेश चतुर्थी साजरी केली. त्यानं त्याच्या पत्नीसह गणपतीची पूजा केली. सोशल मीडियावर त्याचा हा फोटो व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, लिटन दास नुकताच बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारावर आणि तेथील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर बोलला होता.
लिटन दासनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. यामध्ये तो त्याच्या परिवारासोबत दिसत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त त्याच्या घरी पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानं आपल्या पत्नीसोबत गणपतीची पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. यापैकी बऱ्याचशा कमेंट भारतातील क्रिकेट चाहत्यांच्या आहेत.
Ganapati Bappa Morya! 🙏🪔 pic.twitter.com/TooZN8vstv
— Litton Das (@LittonOfficial) September 7, 2024
लिटन दास बांगलादेशसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. त्यानं संघासाठी सलामीला येत अनेकदा शानदारी खेळी केल्या आहेत. लिटन दासनं बांगलादेशसाठी आतापर्यंत 73 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यानं 2655 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावे 4 शतकं आणि 17 अर्धशतकं आहेत. लिटन दासनं 91 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2563 धावा ठोकल्या. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावे 5 शतकं आणि 12 अर्धशतकं आहेत. त्यानं बांगलादेशासाठी 89 टी20 सामन्यांत 1944 धावा केल्या आहेत.
बांगलादेशचा संघ 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. संघानं नुकताच पाकिस्तानचा त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव केला होता.
हेही वाचा –
विराट कोहलीला 10 वेळा बाद करणाऱ्या दिग्गज फिरकीपटूची अचानक निवृत्ती
काय सांगता! वेगवान गोलंदाज अचानक बनला स्पिनर, खेळाडू-कोच कोणाचाच विश्वास बसेना
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची गरुडझेप, भालाफेकीत सिल्वरचं रुपांतर गोल्डमध्ये