भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा खरा चेहरा अजून समोर आलेला नाही, असं बांगलादेशचा क्रिकेटपटू तमिम इक्बालचं मत आहे. तो म्हणाला की, भारतानं काही सामने किंवा मालिका गमावली तर गोष्टी समोर येतील.
गौतम गंभीर हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत खूप आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जायचा. हे त्याच्या कोचिंगमध्येही दिसून येतं. जुलैमध्ये गंभीरनं भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं स्वीकारली. त्यानंतर भारतानं श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका 3-0 ने जिंकली, परंतु एकदिवसीय मालिकेत 0-2 असा पराभव झाला. भारतीय संघानं बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना 280 धावांनी जिंकला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थानावर आहे. पुढील काही महिन्यांत टीम इंडियाला आठ कसोटी सामने खेळायचे आहेत. बांगलादेशचा फलंदाज तमिम इक्बाल म्हणाला की, संघाचं मार्गदर्शन करण्यासाठी गंभीर हा चांगला पर्याय आहे, पण संघ काही सामने हरल्यावर त्याचं ‘खरे चरित्र’ समोर येईल.
जिओ सिनेमावर बोलताना तमीम इक्बाल म्हणाला, “जेव्हा तुम्ही जिंकत असता, तेव्हा तुम्हाला माणसाचं खरं रुप कळत नाही. जेव्हा तुम्ही एखादी मालिका गमावता, नंतर दुसरी गमावता तेव्हा हे लक्षात येतं. तेव्हा खरा चेहरा समोर येतो. तो (गंभीर) एक सक्षम व्यक्ती आहे यात शंका नाही, परंतु हे खूप लवकर आहे. भारताला थोडी वाईट कामगिरी करू द्या. मग बघू काय समोर येतं.”
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाला मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यानंतर वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाईल, जेथे टीम इंडियाला 5 कसोटी सामने खेळायचे आहेत.
हेही वाचा –
कोण आहे तो फलंदाज…ज्यानं वयाच्या 25व्या वर्षी केली डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी! दोन्ही हातांनी करतो गोलंदाजी
कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची बॅटिंग, लवकरच खेळ संपला
बांगलादेशच्या चाहत्यावर हल्ला झाला नाही, पोलिसांनी उघड केलं सत्य