fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एकवेळ मुंबईकडून आयपीएल गाजवणार खेळाडू यावर्षी आयपीएल खेळणारच नाही

2019च्या आयपीएलला बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान मुकणार आहे. त्याला बांगलादेश क्रिकेट बोर्डने (बीसीबी) आयपीएलमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

रहमान खूप वेळा दुखापतग्रस्त झाल्याने त्याला आयसीसी विश्वचषकादरम्यान दुखापत होऊ नये यामुळेच त्याला बीसीबीने त्याला आयपीएलमध्ये खेळण्यास नकार दिला आहे.

रहमान बरोबरच शाकिब अल हसन यालाही बीसीबीने आयपीएलमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. शाकिबला हैद्राबादने संघात कायम ठेवले होते.

2016च्या आयपीएलमध्ये रहमान सनरायजर्स हैद्राबाद या संघाकडून खेळला होता. त्यावेळी हैद्राबाद विजेता ठरला होता. या हंगामात त्याने 16 सामन्यात 17विकेट्स घेत महत्त्वाची भुमिका निभावली होती. तसेच 2017च्या आयपीएल हंगामात तो फक्त एकच सामना खेळू शकला.

आयपीएल 2018 मध्ये रहमान मुंबई इंडियन्सकडून खेळला. यामध्ये त्याने सात सामने खेळले. तर बाकीच्या सामन्यांमध्ये तो पायाच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. यामुळे त्याला मुंबईने मुक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

मोठी बातमी- २०१९आयपीएल लिलावासाठी अंतिम खेळाडूंची निवड जाहीर

शास्त्रींना प्रशिक्षक पदाववर नेमण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा बीसीसीआयवर मोठा आरोप

१८ वर्षीय गोलंदाजाचा कूच बिहार ट्रॉफीत अनोखा पराक्रम

You might also like