भारतीय क्रिकेट संघानं शनिवारी (1 जून) झालेल्या एकमेव सराव सामन्यात बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 5 गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा केल्या होत्या. या सामन्यात रिषभ पंतनं झंझावाती अर्धशतक झळकावलं. त्यानं 32 चेंडूत सर्वाधिक 53 धावा केल्या.
भारताच्या डावादरम्यान बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. आता त्याच्या दुखापतीबाबत एक नवीन अपडेट समोर आलं आहे, जी बांगलादेशसाठी चांगली बातमी नाही. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली आहे.
न्यूयॉर्कमध्ये शनिवारी भारताविरुद्धच्या सराव सामन्यात दुखापत झाल्यानंतर इस्लामच्या डाव्या हाताला सहा टाके घालावे लागले. ‘क्रिकबझ’च्या रिपोर्टनुसार, त्याला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी एक आठवडा लागेल आणि 7 जून रोजी डलास येथे होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळणं त्याच्यासाठी कठीण आहे.
भारताविरुद्धच्या सराव सामन्यात शरीफुल इस्लाम हा बांगलादेशचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यानं 3.5 षटकात 26 धावा देत 1 विकेट घेतली. मात्र त्याला आपला चार षटकांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्याच्या शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर हार्दिक पांड्यानं सरळ फटका मारला. हा चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या तळहाताला अतिशय वेगानं लागला. यानंतर शरीफुल इस्लामला तत्काळ मैदानाबाहेर पाठवण्यात आलं. यावेळी त्याच्या तळहातावर सूज दिसत होती. नंतर कळलं की, इस्लामच्या तळहात आणि तर्जनीमध्ये सहा टाके घालावे लागले आहेत.
Shoriful Islam was badly injured by a shot hit back to him while bowling by Hardik Pandya, but Indian crowd cheered for him for his amazing pace bowling 👏👏#IndvsBang #t20worldcup #hardikpandya #teamindia @mufaddal_vohra pic.twitter.com/wj2HocKJui
— Mitesh (@Mitsi619) June 2, 2024
सराव सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतानं बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत 5 गडी गमावून 182 धावा केल्या होत्या. बांगलादेशसमोर विजयासाठी 183 धावांचं लक्ष्य होतं. मात्र संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 122 धावाच करू शकला.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट सारखं दुसरं कोणीच नाही! टी20 विश्वचषकापूर्वी आयसीसीकडून मिळाला आणखी एक पुरस्कार
अमेरिकेतही रोहित शर्माची क्रेझी फॅन फॉलोइंग! भेट घेण्यासाठी चाहता थेट घुसला मैदानात; पाहा VIDEO
सराव सामन्यात बांगलादेशला हाणला! हार्दिक पांड्याचा अष्टपैलू खेळ, रिषभ पंतही चमकला