सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला 3 एकदिवसीय आणि 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यापैकी बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत 2-0ने आघाडी घेऊन एकदिवसीय मालिका जवळपास खिशात घातली आहे. बांगलादेश आणि भारत या संघातील कसोटी मालिका 14 डिसेंबर पासून खेळवण्यात येणार आहेे. भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी यजमान बांगलादेशने आपला कसोटी संघ घोषीत केला आहे. 17 सदस्यांच्या या संघात स्टार गोलंदाज तस्कीन एहमद याचे पुनरागमन झाले आहे.
अनुभवी फलंदाज तमिम इकबाल (Tamim Iqbal) दुखापतीतून बरा न झाल्याने त्याच्या जागी झाकीर हसन (Zakir Hasan) सामील करण्यात आले. हसन याला भारत अ संघाविरुद्ध पहिल्या अनौपचाारीक कसोटी सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता आणि तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी बांगलादेश संघ:
शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास (Litton Das), महमुदुल हसन ( Mahmudul Hasan), नजमुल हसन शांतो (Najmul Hasan Shanto), मॉमिनुल हक (Mominul Haq), यासिर अली (Yasir Ali), मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim), नूरुल हसन (Nurul Hasan), मेहेदी हसन मिराज (Mehidy Hasan Miraj), ताइजुल इस्लाम (Taijul Islam), तस्कीन अहमद (Taskin Ahmed), खालेद एहमद (Khaled Ahmed), इबादत होसेन (Ibadot Hassain), शोरीफुल इस्लाम (Shoriful Islam), झाकिर हसन (Zakir Hasan), रेजाउर रेहमान राजा (Rejaur Rahman Raja), अनामुल हक (Anamul Haque)
भारत आणि बांगलादेश संघात दुसरा एकदिवसीय सामना ढाका येथे खेळवला गेला. या रोमहर्षक सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव झाला. बांगलादेेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेश संघाने निर्धारित 50 षटकात 271 धावा केल्या. बांगलादेेशचे 6 गडी अवघ्या 69 धावांवर बाद झाले. मात्र, मेहेदी हसन आणि मेहेमदुल्लाह यांनी डाव सावरला. हसन याने झंझावती शतक झळकावले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर विराट कोहली (Virat Kohli) अवघ्या 5 धावांवर बाद झाला. दुखापतग्रस्त रोहित शर्मा (Rohit Sharma) नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. भारताची खिंड अखेरपर्यंत लढवली. मात्र, भारतीय संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यात रोहितला अपयश आले.(Bangladesh has announced 17 members team against India for Test Series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जानेवारीत भारताचे सर्व वरिष्ठ खेळाडू एकत्र खेळणार? राहुल द्रविडने दिलेत संकेत
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात ‘हा’ खेळाडू घेणार रोहित शर्माची जागा, बीसीसीआयच्या सुत्रांकडून माहिती