---Advertisement---

पहिल्या दिवस-रात्र कसोटीसाठी बांगलादेशच्या गोलंदाजांनी लढवली ही अनोखी युक्ती

---Advertisement---

22 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात कोलकाता येथे दिवस-रात्र कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसुन सराव करत आहेत. तसेच या कसोटी सामन्यात येणाऱ्या दवाच्या समस्येला तोंड देण्यासाठी बांगलादेशने एक अनोखी युक्ती लढवली आहे.

या सामन्यची तयारी करताना बांगलादेशचे गोलंदाज पाण्यात चेंडू बुडवून सराव करत आहेत. हा खुलासा बांगलादेशी फिरकी अष्टपैलू मेहदी हसनने केला आहे.

या सामन्यासाठी कोलकाताला जाण्याआधी दोन्ही संघांनी इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये सराव केला आहे. तसेच या सामन्यात गुलाबी चेंडू वापरण्यात येणार आहे.

या सामन्याच्या तयारीबद्दल मेहदी हसन म्हणाला, ‘येत्या काही दिवसांमध्ये वेगवान गोलंदाज चेंडूला पाण्यात बुडवून गोलंदाजी सराव करणे सुरु ठेवतील. मला वाटते की पुढील काही दिवसांमध्ये आम्ही परिस्थितीशी जुळवून घेऊ. फिरकी गोलंदाज चेंडूला स्किड करु शकतात. यावेळी चेंडूला उसळी मिळण्याची आणि चेडू वळण्याची शक्यता आहे.’

तसेच तो गुलाबी चेंडूबद्दल म्हणाला, ‘मी गुलाबी चेंडूवर फलंदाजी केली आहे. खेळपट्टीवर चेंडू पिच झाल्यानंतर वेगाने येतो. कधीकधी बॅटलाही चेंडू लागत नाही. मला वाटते की हा चेंडू अधिक स्विंग करतो. आम्ही गुलाबी चेंडूसाठी अद्याप नवीन आहोत.’

‘आम्हाला गुलाबी चेंडूसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, परंतु आम्ही शक्य तितके कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. दीर्घकाळ खेळणे महत्वाचे ठरेल, खासकरुन जेव्हा फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावला असेल.’

यासह मेहदीने सांगितले की चेंडूचे शिवण पाहणे आव्हान असेल. याबद्दल मेहदी म्हणाला, ‘शिवण पकडताना आणि क्षेत्ररक्षण करतानाही ती पाहण्यात काही अडचण नाही, परंतु सामन्यादरम्यान आपण सावध राहिले पाहिजे. चेंडूची शिवण बरेच वेळा पाहिली जाऊ शकते, परंतु कधीकधी असे प्रसंग उद्भवतात जेव्हा आपण ती पाहू शकत नाही’, असे मेहदी हसन म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---