विचार करा. तुम्ही विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत आहात. तुमच्या देशाचा नॉकआऊट सामना आहे. मात्र मैदानावर जाण्यापूर्वी तुमची टीम बस चुकते आणि तुम्ही सामना मिस करता. आम्ही गंमत करत नसून हे खरंच घडलंय!
ही घटना बांगलादेशचा उपकर्णधार तस्किन अहमदसोबत घडली. त्यानं कबूल केलं आहे की, भारताविरुद्ध टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 सामन्यापूर्वी त्याची टीम बस चुकली होती. मात्र त्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड न होण्याचं कारण हे नसल्याचं त्यानं म्हटलं आहे. टीम कॉम्बिनेशनमुळे मला संघात स्थान मिळालं नसल्याचं तस्किननं म्हटलं आहे.
ढाकाच्या एका वृत्तपत्राशी बोलताना तस्किन म्हणाला, “मला थोडा उशीर झाला होता. पण मी नाणेफेकीपूर्वी मैदानावर पोहोचलो होतो. मी नाणेफेकीच्या 30-40 मिनिटं आधी मैदानावर होतो. माझी टीम बस चुकली होती. सकाळी 8.35 वाजता बस सुटली आणि मी 8.43 वाजता मैदानावर पोहोचलो. मला उशीर झाला होता कारण मी त्या सामन्यात खेळणार नव्हतो.”
त्या सामन्यात बांगलादेशनं तस्किनच्या जागी जाकेर अलीला खेळवलं होतं. अफगाणिस्तानविरुद्धच्या पुढील सामन्यात तस्किन संघात परतला. बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बाल यानं ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या टाइमआउट शोमध्ये बांगलादेश संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर टीका केली होती. तस्किनला प्लेईंग इलेव्हनमध्ये नक्कीच स्थान मिळायला हवं होतं, असे तो म्हणाला होता.
या घटनेसाठी तस्किनला दंड करण्यात आला नसल्याची माहिती आहे. तस्किननं टीम मॅनेजमेंटची माफी मागितल्यानंतर हे प्रकरण बंद करण्यात आलं. याबाबत मंगळवारी पत्रकारांशी बोलताना जेष्ठ खेळाडू शाकिब म्हणाला, “टीम बस ठराविक वेळेवर धावते. बस कोणाचीही वाट पाहत नाही, असा नियम आहे. जर कोणाची बस चुकली तर तो संघ व्यवस्थापकाच्या कार किंवा टॅक्सीनं मैदानावर येतो. तस्किन टॉसच्या अवघ्या 5-10 मिनिटांपूर्वी पोहोचला होता. त्याबद्दल त्यानं माफी मागितली आहे. त्यानं हे जाणूनबुजून केलं नाही. ही खूप साधी गोष्ट होती, जी तिथेच संपली.”
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, त्यांनी या घटनेशी संबंधित अहवाल संघ व्यवस्थापकाकडून मागितला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईमध्ये कधी होणार टीम इंडियाची विजयी परेड; समोर आलं संपूर्ण वेळापत्रक
भारत-इंग्लंड लढत आज! पीटरसन, युवराज अन् हरभजन सारखे दिगग्ज दिसतील ॲक्शनमध्ये; कधी आणि कुठे पाहता येणार सामना?
कमबॅक असावा तर असा! हार्दिक पांड्याचं टीकाकारांना सडेतोड उत्तर, टी20 क्रमवारीत अव्वल स्थानी झेप