बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांविरुद्ध आपला-आपला शेवटचा ग्रुप स्टेज सामना खेळत आहे. शनिवारी (11 नोव्हेंबर) पुण्याच्या एमसीएस स्टेडियमवर हा सामना आयोजित केला गेला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने या सामन्यात 8 विकेट्सच्या नुकसानावर 306 धावांपर्यंत मजल मारली. तौहिद ह्रदोय याचे सर्वाधिक धावांचे योगदान संघासाठी दिले. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी शॉन ऍबॉट आणि ऍडम झॅम्पा यांनी महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या.
अफगाणिस्तानला या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागली. 50 षटकात अफगाणिस्तान संघ 8 विकेट्सच्या नुकसानावर 306 धावांपर्यंत पोहोचला. यामध्ये पहिल्या तीन फलंदाजांनी 36, 36 आणि 45 अशा धावा करून विकेट्स गमावल्या. चौथ्या क्रमांकावर आलेल्या तौहिद ह्रदोय (Towhid Hridoy) याने मात्र 79 चेंडूत 74 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पाचव्या क्रमांकावर महमतुल्हार याने 32, तर मुशफिकूर रहीम याने 21 धावा केल्या. मेहिदी हसन मिराझ 29, तर मसूम अहमद याने 7 धावांचे योगदान दिले.शॉन ऍबॉट याने 10 षटकांमध्ये 61 धावा दिल्या, तर ऍडम झॅम्पा याने 32 धावा खर्च करून प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. मार्क स्टॉयनिस याला एक विकेट मिळाली. (Bangladesh scored 306 runs against Australia)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शॉन ऍबॉट, पॅट कमिन्स (कर्णधार), ऍडम झॅम्पा, जोश हेझलवूड.
बांगलादेश – लिटन दास, तन्झीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, तौहिद हृदोय, महेदी हसन, नसुम अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्धचा सामना माझा कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो, इंग्लंडच्या खेळाडूचं धक्कादायक विधान
उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात? इंग्लंडने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय