बांगलादेश आणि भारतीय महिला क्रिकेट संघातील वनडे मालिका शनिवारी (22 जुलै) संपली. उभय संघांतील शेवटचा सामना बरोबरीत सुटल्यामुळे मालिका देखील बरोबरीत सुटली. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात हरमनप्रीत कौर आणि मैदानातील पंचांमध्ये वाद पाहायला मिळाला. याच पार्श्वभूनीवर बांगलादेशची महिला संघाची कर्णधार निगार सुलताना हिनेही आपले मत व्यक्त केले.
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात विजयासाठी भारतीय महिला संघाला 226 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरत भारतीय संघ 49.3 षटकात 225 धावा करून सर्वबाद झाला. परिणामी सामना आणि मालिका बरोबरीत सुटली. भारताच्या डावातील डावातील 34व्या षटकात कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) नाहिता अख्तरच्या चेंडूवर फाहिमा खातूनच्या हातात झेलबाद झाली. चेंडू आधी हरमनप्रीतच्या हाताला लागला की पॅडला, यावरून मैदानात हा वाद झाला होता. पंचांनी तिला बाद दिले, मात्र हरमनप्रीत पंचांशी सहमनत नव्हती. पंचांच्या या निर्णायनंतर तिने स्टंप्सला बॅट मारली आणि खेळपट्टी सोडताना पंचाशी शाब्दिक चकमक देखील झाली. सामना संपल्यानंतरही हरमनप्रीतने पंचांच्या निर्णायबाबत नाराजी व्यक्त केली.
हरमनप्रीतचे मैदानातील वर्तन आणि सामना संपल्यानंतर केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देण्याचे काम निगार सुलतानने केले आहे. बांगलादेश संघाची कर्णधार म्हणाली, “जर ती बाद नसती, तर पंचांनी तिला बाद दिलेच नसते. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पंच आमच्याकडे आहेत. त्यामुळे ते दर्जेदार आहेत. ही पूर्णपणे हरमनप्रीत कौरची समस्या आहे. मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. ती मैदानात अधिक चांगली वागणूक दाखवू शकली असती.”
काय म्हणाली होती हरमनप्रीत कौर?
दरम्यान, सामना संपल्यानंतर हरमनप्रीत पंचांच्या निर्णायवर नाराजी व्यक्त केली होती. “मालिकेत ज्या प्रकारची अंपायरिंग होत होती. ज्यामुळे आम्ही खूप आश्चर्यचकित झालो होतो. पुढच्या वेळी आम्ही बांगलादेशात आल्यावर याची खात्री करून घेऊ की, आम्हाला या प्रकारच्या अंपायरिंगला सामोरे जावे लागेल आणि स्वतःला यासाठी तयार करावे लागेल,” असे भारतीय कर्णधार म्हणाली. (Bangladesh skipper Nigar Sultana responded to Harmanpreet Kaur)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्धच्या फायनलची नाणेफेक भारताच्या पारड्यात! टीम इंडिया करणार प्रथम गोलंदाजी, पाहा प्लेइंग इलेव्हन
पंचांशी वाद पडला महागात, पुढचे 24 महिने हरमनप्रीतला सावध रहावं लागणार