आंध्र क्रिकेट असोसिएशनने औपचारिक स्वरूपात सनरायजर्स हैदराबाद समोर एका नवीन घरेलू मैदानाचा प्रस्ताव ठेवला आहे. हैदराबाद संघाला ऑफर करण्यात आले आहे की, ते त्यांचं घरेलू मैदान बदलणार असतील तर ते विशाखापटनम निवडू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार आंध्र क्रिकेट असोसिएशनने हा प्रस्ताव मांडला आहे. सनरायजर्स हैदराबाद संघ आयपीएल 2025 मध्ये त्यांचे बाकी सामने विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळू शकते.
ही ऑफर अशा वेळी आली आहे की, जेव्हा मागच्या काही दिवसात हैदराबाद क्रिकेट असोसिएशन आणि सनरायजर्स हैदराबाद संघामध्ये तिकिटांविषयी मतभेद होत होते. सनरायजर्स हैदराबाद मॅनेजमेंटने आरोप केले होते की, हैदराबाद क्रिकेट असोसिएशन मोफत तिकिटांसाठी त्रास देत आहे. या कारणाने हैदराबाद संघाने त्यांचं घरेलू मैदान बदलण्याची धमकी दिली होती.
या विषयात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तपास करण्याचे आदेश दिले होते. यामध्येच आंध्र क्रिकेट असोसिएशनने काव्या मारनच्या लीडरशीपमधील हैदराबाद संघाला घरेलू मैदान बदलण्याची प्रस्ताव दिला. विशाखापट्टणम मधील वीडीसीए क्रिकेट स्टेडियम आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाच दुसरं घरेलू मैदान आहे. आतापर्यंत या मैदानावर आयपीएल 2025 मधील दोन सामने खेळले गेले आहेत. दिल्ली विरुद्ध लखनऊ आणि दिल्ली विरुद्ध हैदराबाद. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
आंध्र क्रिकेट असोसिएशनने आत्ताच विशाखापट्टणमच्या मैदानावर नवीन काम करून घेतल आहे. विजग स्टेडियम मध्ये आता 28 हजार प्रेक्षक बसण्याइतकी व्यवस्था आहे. यामध्ये तिथे सामना भरवल्याने सनरायजर्स हैदराबाद संघाला प्रत्येक आयपीएल सामन्यामागे 3 करोड रुपयांचे नुकसान होऊ शकते. या कारणाने आंध्र क्रिकेट असोसिएशन हैदराबाद संघाला एसजीएसटी टॅक्स मध्ये 1 करोड रुपयांची सवलत देण्यासाठी तयार आहे.





