---Advertisement---

आशिया चषकातील हाराकिरी जिव्हारी! बांगलादेशच्या स्टार यष्टीरक्षकाचा टी20 क्रिकेटला अलविदा

shakib-rahim
---Advertisement---

आशिया चषक 2022 मधील अत्यंत खराब प्रदर्शनानंतर बांगलादेशचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम याने निवृत्तीची घोषणा केली आहे. 35 वर्षीय रहीमने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटला अलविदा केला आहे. त्याने स्वत सोशल मीडियाद्वारे याबद्दल माहिती दिली गेली आहे. टी20 स्वरूपातून निवृत्त झाला तरीही तो फ्रँचायझी लीग खेळ राहणार असल्याचे त्याने सांगितले आहे. 

रहीमने (Mushfiqur Rahim) ट्वीटरद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा (Mushfiqur Rahim T20I Retirement) करताना लिहिले की, मी “आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मला आता माझे पूर्ण लक्ष कसोटी आणि वनडे क्रिकेटवर केंद्रित करायचे आहे. मी फ्रँचायझी लीग खेळण्यासाठी उपलब्ध राहील. जेव्हा आणि जिथे मला संधी मिळेल, तिथे मी खेळायला जाईल. मी आता उरलेल्या दोन क्रिकेट स्वरूपात (वनडे आणि कसोटी) देशाचे प्रतिनिधित्त्व करेल.” 

https://twitter.com/mushfiqur15/status/1566309090586140672?s=20&t=rcXECOw8NEj_3ijSdJbntg

बांगलादेशची आशिया चषकात हाराकिरी
दरम्यान शाकिब अल हसनच्या नेतृत्त्वाखाली बांगलादेश संघाला आशिया चषकात चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्यांनी साखळी फेरीतील आपले दोन्हीच्या दोन्ही सामने गमावले आणि त्यांना पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. बांगलादेशला त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने पराभवाची धूळ चारली. अफगाणिस्तानने 7 विकेट्सने तो सामना जिंकला. त्यानंतर श्रीलंकेने अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करत निदाहास ट्रॉफी 2018 मधील पराभवाचा वचपा काढला. बांगलादेशने 2 विकेट्सने हा सामना गमावला. अशाप्रकारे दोन पराभवांसह बांगलादेशच्या संघाला रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.

मुशफिकुर रहीमची टी20 क्रिकेटमधील कामगिरी
यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकूर रहीम याच्या टी20 क्रिकेटमधील प्रदर्शनाबाबत बोलायचे झाल्यास, त्याने 102 टी20 सामने खेळले आहेत. या 102 सामन्यांमध्ये 19.23 च्या सरासरीने त्याने 1500 धावा काढल्या आहेत. यादरम्यान त्याला फक्त 6 अर्धशतके करता आली आहेत. यंदाच्या आशिया चषकातही त्यांचे प्रदर्शन जास्त खास राहिले नव्हते. श्रीलंकेविरुद्ध तो 4 धावा आणि अफगाणिस्तानविरुद्ध फक्त 1 धाव करू शकला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

INDvsPAK: भारताला आणखी एक धक्का, खुद्द द्रविडने सांगितलेय; प्लेइंग इलेव्हनबद्दलही दिलेत संकेत
अल्टिमेट खो खो स्पर्धेत तेलगु योद्धाज व ओडिशा जगरनट्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत
गावसकरांनी ४३८ धावांचे लक्ष्य जवळपास गाठून दिले होते, पण….

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---