ढाका। बांगलादेश विरुद्ध विंडीज संघात शुक्रवारपासून (30 डिसेंबर) सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी(2 डिसेंबर) बांगलादेशने एक डाव आणि 184 धावांनी विजय मिळवला.
तसेच 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विंडीजला व्हाईटवॉश दिला आहे. हा बांगलादेशचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला आहे.
बांगलादेश संघाचा हा 112 वा कसोटी सामना होता. त्यांनी याआधी खेळलेल्या 111 कसोटी सामन्यांमध्ये त्यांना कधीही एका डावेने विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे आज विंडीज विरुद्ध मिळवलेला विजय त्यांचा पहिलाच एका डावेने मिळवलेला विजय ठरला आहे.
तसेच कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत एकूण 10 संघांनी किमान एकातरी सामन्यात एका डावेने विजय मिळवला आहे. त्यातील न्यूझीलंड संघाला पहिला एका डावाने विजय मिळवण्यासाठी सर्वाधिक सामने खेळावे लागले होते. त्यांनी त्यांच्या 119 व्या कसोटी सामन्यात पहिला एका डावेने विजय मिळवला होता.
तसेच यासाठी पाकिस्तान संघाला सर्वात कमी सामने खेळावे लागले होते. त्यांनी त्यांच्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात एका डावेने विजय मिळवला होता.
पहिला एका डावाने विजय मिळवण्यासाठी खेळावे लागलेले सामने-
2 – पाकिस्तान
11 – इंग्लंड/ झिम्बाब्वे
16 – दक्षिण आफ्रिका
19 – विंडीज
25 – भारत
42 – आॅस्ट्रेलिया
67 – श्रीलंका
112 – बांगलादेश
119 – न्यूझीलंड#म #मराठी @Maha_Sports
— Pranali Kodre (@Pranali_k18) December 2, 2018
आत्तापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका डावेने विजय इंग्लंड संघाने मिळवला आहे. त्यांनी 104 वेळा एका डावेने विजय मिळवला आहे. त्यांच्या पाठोपाठ आॅस्ट्रेलिया(91), दक्षिण आफ्रिका(46), भारत(42), विंडीज(41), पाकिस्तान(30), न्यूझीलंड(24), श्रीलंका(21), झिम्बाब्वे(2) आणि बांगलादेश(1) आहेत.
त्याचबरोबर बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजांनी या कसोटी मालिकेत एक विश्वविक्रमही केला आहे. विंडीजच्या सर्व फलंदाजांना मालिकेतील दोन्ही सामन्यातील चारही डावात बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजांनीच बाद केले आहे.
त्यामुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एका संघाच्या सर्व 40 फलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकी गोलंदांनी बाद करण्याची ही कसोटी क्रिकेटमधील पहिलीच वेळ आहे. याआधी बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजांनी 2016 मध्ये इंग्लंड विरुद्ध 38 विकेट्स घेण्याची कमाल केली होती.
विंडीज विरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात महमुद्दुलाहने 134 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच शाद्बम इस्लाम आणि लिटॉन दासने अर्धशतकी खेळी केली होती. त्यांच्या या खेळीच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या डावात 508 धावंसंख्या गाठली.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या विंडीज संघाला मात्र खास काही करता आले नाही. त्यांचा पहिला डाव 111 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे त्यांच्यावर फॉलोआॅनची नामुष्की ओढावली.
दुसऱ्या डावात विंडीजकडून फक्त शिमरॉन हेटमेयरने चांगला प्रतिकार केला. त्याने 92 चेंडूत 93 धावांची आक्रमक खेळी केली. यात त्याने तब्बल 9 षटकार आणि 1 चौकार मारला. मात्र त्याला अन्य फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. अन्य फलंदाजांनी नियमित कांलांतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे विंडीजचा दुसरा डावही 213 धावांवर संपला.
बांगलादेशकडून या सामन्यात मेहदी हसनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने या सामन्यात एकूण 12 विकेट्स घेतल्या. तसेच बांगलादेशच्या अन्य गोलंदाजांपैकी शाकीब अल हसनने 4, तैजूम इस्लामने 3 आणि नयीम हसनने 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या:
–दक्षिण आफ्रिकेच्या स्टेनगनचे ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेबद्दल मोठे वक्तव्य
–२०१९च्या विश्वचषकासाठी धोनी संघात असायलाच पाहिजे…
–माझ्या बाबतीतील ती जाहिरात खोटी, सेहवागने केला खुलासा
–ब्रेंडन मॅक्यूलमचे बंधू प्रेम; भावाच्या निधनाची खोटी बातमी पसरवणाऱ्याला शोधूनच काढेल…
–तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटमध्ये घडला असा दुर्मिळ पराक्रम