बांगलादेश आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू महमदुल्लाह याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. त्याने हा सामना झाल्यानंतर कसोटी क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
कसोटी कारकिर्दीतील ५० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या महमदुल्लाहने ७-८ जुलै रोजी, पहिल्या डावात अडचणीत असलेल्या बांगलादेश संघाला नाबाद १५० धावांची खेळी करत भक्कम स्थितीत आणले होते. या खेळीच्या जोरावर बांगलादेश संघाने ४६८ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाला अवघ्या २७६ धावा करण्यात यश आले होते.(Bangladesh team all rounder Mahmudullah shocking decision to retirement from test cricket)
महमदुल्लाहची अप्रतिम खेळी
पहिल्या डावात ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या महमदुल्लाहने २७८ चेंडूंचा सामना करत नाबाद १५० धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने १७ चौकार आणि १ षटकार लगावला होता. तसेच त्याने लिटन दाससोबत मिळून ७ व्या गड्यासाठी १३८ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर ९ व्या गडीसाठी तस्किनसोबत मिळून १९१ धावांची भागीदारी केली होती.
अचानक घेतलेल्या निर्णयामुळे बोर्डाला झाले आश्चर्य
महमदुल्लाहने निवृत्ती जाहीर करण्यापूर्वी, बोर्डाला कुठलीही माहिती दिली नव्हती. बोर्ड अध्यक्ष नजमुल हसनेने याबाबत बोलताना म्हटले की, “आम्हाला तो निवृत्ती जाहीर करणार आहे याबाबत कुठलीही माहिती नव्हती. त्याने याबाबत बोर्डाला कुठलीही माहिती दिली नव्हती. आम्हाला अचानक एक कॉल आला आणि म्हटले गेले की, त्याला आता कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा नाही.”
महमदुल्लाहची कसोटी कारकीर्द
महमदुल्लाहने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ४९ सामने खेळले आहेत. यात त्याने ३१.८ च्या सरासरीने एकूण २७६४ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने ४३ गडी देखील बाद केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडचा विजयासह श्रीगणेशा, पहिल्या टी२०त भारतीय संघाला १८ धावांनी दिला धोबीपछाड
चालू सामन्यात चक्क अंपायरने कापले ‘लिटल मास्टर’ गावसकरांचे केस, वाचा तो किस्सा
चूक भोवली! फलंदाजाने ‘ब्रेक डान्स’ करताच गोलंदाज अंगावर गेला धावून, आयसीसीने ठोठावला दंड