---Advertisement---

इंग्लंडचा विजयासह श्रीगणेशा, पहिल्या टी२०त भारतीय संघाला १८ धावांनी दिला धोबीपछाड

On: शनिवार, जुलै 10, 2021 10:31 AM
---Advertisement---

वनडे मालिकेत २-१ ने पराभूत झाल्यानंतर भारतीय महिला संघ आता इंग्लंड महिला संघाविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना शुक्रवारी (९ जुलै) पार पडला. ज्यामध्ये इंग्लंड महिला संघाने १८ धावांनी विजय मिळवला आहे. यासह टी२० मालिकेत त्यांनी १-० अशी आघाडी घेतली आहे.

इंग्लंड संघाला १७७ धावा करण्यात आले होते यश
या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघातील फलंदाजांनी तुफान फलंदाजी केली. सिवरने अवघ्या २७ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. यामध्ये तिने ८ चौकार आणि एक षटकार लगावला होता. तर ॲमी जोन्सने २७ चेंडूत ४३ धावांचे योगदान दिले. यामध्ये तिने ४ चौकार आणि २ खणखणीत षटकार लगावले होते. तसेच डॅनी वॅटने देखील ३१ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर २० षटक अखेर इंग्लंड महिला संघाला ७ बाद १७७ धावा करण्यात यश आले होते.

भारतीय महिला संघाचा पराभव
इंग्लंड संघाने दिलेल्या १७८ धावांचा पाठलाग करताना पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे काही वेळ सामना थांबवला गेला होता. त्यानंतर सामना पुन्हा एकदा सुरू करण्यात आला होता. डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतीय महिला संघाला विजयासाठी ८.४ षटकात ७३ धावा करायच्या होत्या. परंतु भारतीय महिला संघाला अवघ्या ५४ धावा करण्यात यश आले होते. यादरम्यान स्म्रिती मंधांनाने सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. या खेळीसाठी तिने ६ चौकार लगावले होते. तसेच हरलीन देओलने १७ धावांचे योगदान दिले होते. (England women’s team beat indian women’s team by 18 runs in first T20I)

टी-२० मालिकेतील पुढील सामना रविवारी (११ जुलै) खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय महिला संघ जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रतिक्षेत असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

नव्या भिडूंसह स्टोक्सची करामत! पहिल्याच वनडे सामन्यात नेतृत्व करताना धोनीला पछाडले

श्रीलंका दौऱ्यात युजवेंद्र चहलची अग्निपरिक्षा; पाहा या दौऱ्याबद्दल काय म्हणाला भारतीय फिरकीपटू

विम्बल्डन २०२१: विक्रमी २० वे ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी जोकोविच समोर फायनलमध्ये इटलीच्या बेरेटिनीचे आव्हान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---