---Advertisement---

88 नो-बॉल! रवींद्र जडेजाच्या ओव्हरस्टेपमुळे भारताची डोकेदुखी वाढली, टॉप 5 फिरकीपटूंची ‘ही’ यादी चकीत करणारी

On: गुरूवार, ऑगस्ट 27, 2026 11:11 AM
---Advertisement---

श्रीलंका आणि भारत यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. 23 ऑगस्टपासून कोलंबो येथे सुरू असलेल्या या सामन्यात भारत जिंकण्याच्या स्थितीत आहे. यामध्ये भारतीय फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी केली आहे, मात्र भारतीय फिरकी गोलंदाज त्यांच्या नो-बॉलमुळे चर्चेत आले आहेत.

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये मिळून भारतीय फिरकीपटूंनी आतापर्यंत 10 नो-बॉल्स टाकले आहेत, जे 2021 पासून कसोटी क्रिकेटमध्ये फिरकीपटूंनी टाकलेले सर्वाधिक आहेत. या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे.

भारताचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी कसोटी क्रिकेटमध्ये फ्री हिटचा नियम लागू करावा, असे मत व्यक्त केले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये 2021 पासून फिरकीपटूंनी टाकलेले सर्वाधिक नो-बॉल्सची यादी पाहिली तर 88 आकडेवारीसह जडेजा पहिल्या स्थानी आहे. चकीत करणारी बाब म्हणजे या यादीत पहिल्या पाचमध्ये जे खेळाडू आहेत, त्यातील एकानेही 50 चा आकडा गाठलेला नाही. दुसऱ्या स्थानावर असणारा नोमान अली याने केवळ 40 नो-बॉल्स टाकले आहेत.

सुरू असलेल्या कसोटीमध्ये जडेजा सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहे. त्याने 90 कसोटी सामने खेळले आहेत, मात्र त्याची नो-बॉलची वाढती संख्या संघाची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे.

2021 पासून कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाजांकडून टाकण्यात आलेले सर्वाधिक ‘नो बॉल्स’
15 – अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, 2023
14 – भारत विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2021
10*- भारत विरुद्ध श्रीलंका, कोलंबो (एसएससी), 2026
9 – श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज, नॉर्थ साउंड, 2021
9 – भारत विरुद्ध न्यूझीलंड, मुंबई (वानखेडे), 2024

2021 पासून कसोटी क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांनी टाकलेले सर्वाधिक ‘नो-बॉल्स’:
88* – रवींद्र जडेजा
40 – नोमान अली
33 – लसिथ एम्बुल्डेनिया
19 – जॅक लीच
17 – जोमेल वॉरिकन

कोलंबो कसोटी
या कसोटीत भारताने पहिला डाव 503 धावसंख्येवर घोषित केला, तर श्रीलंकेचा दुसरा डाव 290 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने श्रीलंकेला फॉलो-ऑन दिला असून श्रीलंकेने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसाखेर 6 विकेट्स गमावत 229 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---