कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे 4 दिवस पूर्ण झाले असून, सामन्यात टीम इंडियाचा (Team india) विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या यजमान श्रीलंका संघाने 6 गडी बाद 229 धावा केल्या आहेत. यामुळे श्रीलंकेकडे सध्या केवळ 16 धावांची आघाडी आहे. येथून श्रीलंकेचा विजय कोणत्याही परिस्थितीत शक्य वाटत नाही, परंतु श्रीलंकेचे माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू एंजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews on 2nd test between IND vs SL) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, जर श्रीलंका संघाने 200 धावांची आघाडी घेतली, तर सामना अतिशय रंजक होईल. मॅथ्यूज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट शेअर करताना लिहिले, “जर श्रीलंका संघाने 200 धावांची आघाडी मिळवली, तर हा सामना खूप रंजक होईल.
श्रीलंका संघाने आपले 6 फलंदाज गमावले आहेत. आता क्रीजवर येणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा आणि असिथा फर्नांडो बाकी आहेत. हे तिघेही प्रामुख्याने गोलंदाज म्हणून खेळतात, त्यामुळे यांच्याकडून फार मोठ्या धावसंख्येची अपेक्षा करता येणार नाही.
सध्या क्रीजवर फलंदाजीसाठी सोनल दिनुशा आणि केशरा नुवानथा उपस्थित आहेत. संघासाठी सर्वात मोठी आशा सोनल दिनुशा असेल, ज्याने पहिल्या डावात 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 103 धावा केल्या होत्या. जर पाचव्या दिवशी त्याची विकेट लवकर पडली, तर संघाला 50 धावांची आघाडी घेणे देखील कठीण होईल. त्यामुळे आता पाचव्या दिवशी सामन्यात काय घडते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 229 धावा केल्या होत्या आणि त्यांच्याकडे अवघ्या 16 धावांची आघाडी होती. दिवसाच्या सुरुवातीला श्रीलंका संघ पहिल्या डावात 290 धावांवर ऑल-आऊट झाला होता, ज्यामुळे ते 213 धावांनी पिछाडीवर पडले होते. हे लक्षात घेऊनच, पहिल्या डावात 503 धावा करणाऱ्या टीम इंडियाने त्यांना फॉलोऑन देत दुसऱ्या डावात पुन्हा फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.






