---Advertisement---

फॉलो-ऑन दिला अन् गमावला सामना! हा लाजिरवाणा विक्रम दोन संघांच्या नावावर, ऑस्ट्रेलिया आणि….

On: बुधवार, ऑगस्ट 26, 2026 12:37 PM
---Advertisement---

श्रीलंका आणि भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो येथे 23 ऑगस्टपासून खेळला जात आहे. यामधील पहिला डाव भारताने 503 धावांवर 9 विकेट्स असताना घोषित केला, तर श्रीलंकेचा पहिला डाव 290 धावसंख्येवर संपुष्टात आला. अशा स्थितीत भारताने श्रीलंकेला फॉलो-ऑन दिला असून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून भारत हा कसोटी सामना जिंकण्याच्या उत्तम स्थितीत आहे. मात्र कसोटीच्या इतिहासात चार अशी उदाहरणे आहेत, जेव्हा फॉलो-ऑन देऊनही एखाद्या संघाला सामना गमवावा लागला आहे. हा नकोसा विक्रम दोन संघांच्या नावावर आहे.

ऑस्ट्रेलियासोबत तीन वेळा घडले
जेव्हा त्यांनी पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली आणि विरोधी संघ फॉलो-ऑन टाळू शकला नाही, हे ऑस्ट्रेलियासोबत तीन वेळा असे घडले आहे. फॉलो-ऑन देऊनंही ऑस्ट्रेलिया तीन वेळा हरला आहे.

ऑस्ट्रेलियासोबत असे पहिल्यांदा 1894 मध्ये घडले आहे. सिडनीमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत 586 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 325 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला ऑस्ट्रेलियाने फॉलो-ऑन दिला आणि इंग्लंडने दुसऱ्या डावात 437 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात फलंदाजी करावी लागली आणि त्यांचा डाव 166 धावसंख्येवर संपुष्टात आला. हा सामना ऑस्ट्रेलियाने अवघ्या 10 धावांनी गमावला.

दुसऱ्यांदा असे 1981 मध्ये घडले, तेव्हा पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला इंग्लंडने धक्का दिला. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 401 धावसंख्येवर घोषित केला. नंतर इंग्लंडचा पहिला डावा 174 धावसंख्येवर संपुष्टात आल्याने त्यांना फॉलो-ऑन मिळाला आणि त्यांनी दुसऱ्या डावात 356 धावा केल्या. तर विजयासाठी 130 धावांचे लक्ष्य असताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 111 धावांवर संपला आणि इंग्लंडने हा सामना 18 धावांनी जिंकला.

ऑस्ट्रेलियासोबत असे तिसऱ्यांदा घडले, ईडन गार्डन्सवर 2001 मध्ये. भारताविरुद्धच्या त्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारताचा पहिला डाव 171 धावसंख्येवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने यजमानांना फॉलो-ऑन दिला. तेव्हा भारताने व्हीव्हीएस लक्ष्मणच्या 281 धावा आणि राहुल द्रविडच्या 180 धावांच्या जोरावर दुसऱ्या डावात 7 विकेट्स गमावत 657 धावांचा डोंगर उभारला.

कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 384 धावांचे लक्ष्य मिळाले होते. तेव्हा हरभजन सिंगच्या फिरकीसमोर कांगारू 212 धावसंख्येवर गारद झाला. हरभजनने 6 विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना भारताने 171 धावांनी जिंकला होता.

फॉलो-ऑनमध्ये दोनदा ऑस्ट्रेलियाला धक्का देणारा इंग्लंडही एक सामना हरला आहे. 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडने पहिला डाव 8 विकेट्स गमावत 435 धावांवर घोषित केला होता. न्यूझीलंडचा पहिला डाव 209 धावांवर आटोपला. त्यामुळे फॉलो-ऑन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 483 धावा केल्या.

वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेले्ल्या या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य मिळाले आणि त्यांचा दुसरा डाव 256 वर संपला. यावरून हा सामना न्यूझीलंडने अवघ्या एका धावेने जिंकला. (Enforced follow-on and lost match! This embarrassing record is held by two teams: Australia and…)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---