---Advertisement---

मोठी बातमी! बुमराहचे वर्चस्व संपुष्टात, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने कसोटी क्रमवारीत काबीज केले अव्वल स्थान

On: बुधवार, ऑगस्ट 26, 2026 2:13 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश मॅके कसोटी, इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान पहिला कसोटी सामना आणि सुरू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने बुधवारी (26 ऑगस्ट) क्रमवारी जाहीर केली आहे. मॅके कसोटी सामन्यात प्रभावी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने त्याच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करताना त्याने जसप्रीत बुमराह याला मागे टाकले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज फेब्रुवारी 2024 मध्ये पहिल्यांदा अव्वल स्थानी आला आणि त्याने सुमारे दोन वर्ष हे स्थान कायम राखले. आता त्याच्या या स्थानाला स्टार्कने धक्का दिला आहे.

श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील बुमराहची अनुपस्थिती आणि बांगलादेशविरुद्ध स्टार्कची चमकदार कामगिरी यांमुळे आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत मोठा बदल झाला आहे.

स्टार्कने मॅके कसोटीत 10 विकेट्स घेतल्या होत्या. 36 वर्षीय डावखुऱ्या गोलंदाजाने 12 धावांत सहा आणि 39 धावांत चार विकेट्स घेत डावाच्या आणि 51 धावांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

या कामगिरीमुळे त्याने मॅट हेन्री आणि जसप्रीत बुमराह यांना मागे टाकले असून, तो त्यांच्यापेक्षा 10 रेटिंग गुणांनी आघाडीवर आहे. गेल्या वर्षी बॉक्सिंग डे कसोटीनंतर दुसरे स्थान पटकावणाऱ्या स्टार्कला मॅके कसोटीनंतर सामनावीर आणि मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

स्टार्कने 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले. त्याच्या 15 वर्षांनंतर तो कारकीर्दीत पहिल्यांदाच कसोटी गोलंदाजी क्रमवारीच्या पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

कसोटी फलंदाजी क्रमवारीत इंग्लंडच्या हॅरी ब्रूकचे पहिले स्थान कायम आहे. दुसऱ्या स्थानी त्याचाच संघसहकारी जो रूट असून तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी अनुक्रमे स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड आहे. या क्रमवारीत भारताच्या विकेटकीपरला मोठा फायदा झाला आहे.

ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वेगवान अर्धशतक केले आणि क्रमवारीत सहा स्थानांची झेप घेत सातवे स्थान गाठले आहे. तसेच त्याचे आणि भारतीय कर्णधार शुभमन गिलचे समान रेटिंग पॉइंट आहेत, 711. (Mitchell Starc Diaplaces Jasprit Bumrah to take NO. 1 position in ICC MEN’S TEST Bowling Rankings)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---