भारत आणि बांगलादेश (India And Bangladesh) यांच्यामध्ये आगामी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यातील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. (19 सप्टेंबर) रोजी भारत आणि बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्यसाठी चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर आमने-सामने असणार आहेत. तत्पूर्वी आपण दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकाॅर्ड्स जाणून घेऊया.
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 8 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये 1 मालिका वगळता प्रत्येक वेळी भारताने बाजी मारली आहे. बांगलादेशला आजपर्यंत भारताविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. कारण एक कसोटी मालिका अनिर्णित राहिली होती. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आतापर्यंत बांगलादेशला कसोटीमध्ये भारताविरूद्ध एकही कसोटी सामना जिंकता आला नाही.
भारत-बांगलादेश संघांमध्ये आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 11 वेळा भारताने विजय मिळवला असून 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. दोन्ही संघातील आगामी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत, तर दुसरा सामना कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघ आपले वर्चस्व राखण्यात कायम राहणार की नाही? हे पाहणे देखील महत्वाचे ठरेल.
तत्पूर्वी शेवटच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानचा घरात घुसून धुव्वा उडवला होता. त्याआधी बांगलादेशचा संघ पाकिस्तानविरूद्ध कधीही कसोटी मालिका जिंकला नव्हता. 2 सामन्यांची कसोटी मालिका जिंकून बांगलादेशने पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे भारत आणि बांगलादेश दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रियान पराग किंवा हार्दिक पांड्या नव्हे तर ‘हा’ भारतीय क्रिकेटर आहे अनन्या पांडेचा क्रश
पाकिस्तानला मोठा दिलासा! फाॅर्ममध्ये परतला ‘हा’ स्टार फलंदाज
“माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय आहेस तू”, वाढदिवशी पत्नी देविशाकडून सूर्यकुमारला प्रेमळ शुभेच्छा