---Advertisement---

बांगलादेशच घोडं आशिया कप आधीच अडल! एका पाठोपाठ तीन मॅचविनर स्पर्धेतून बाहेर

On: बुधवार, ऑगस्ट 24, 2022 6:04 PM
---Advertisement---

आशिया चषक २०२२ च्या मुख्य फेरीचे सामने २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी बांगलादेश संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. संघाचा २२ वर्षीय युवा वेगवान गोलंदाज हसन महमूद आणि संघाचा यष्टिरक्षक फलंदाज नुरुल हसन दुखापतींमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडलेत. या दोन खेळाडूंपूर्वी अनुभवी फलंदाज लिटन दासही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे.

दुखापतग्रस्त फलंदाज नूरुल हसनच्या जागी मोहम्मद नईमचा संघात समावेश करण्यात आला आहे. तेवीस वर्षीय नईमने बांगलादेशकडून आतापर्यंत ३४ टी२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३४ डावांमध्ये २४.५१ च्या सरासरीने ८०९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १०३.५ राहिला असून, टी२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर चार अर्धशतके आहेत.

आशिया कप २०२२ चा पहिला सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये आयोजित केली जात आहे. बांगलादेश संघाने भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू श्रीधरन श्रीराम यांचा तांत्रिक सल्लागार तसेच टी२० संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून समावेश केला आहे. बांगलादेश आशिया चषकातील आपला पहिला सामना अफगाणिस्तान विरूद्ध खेळणार आहे. हा सामना ३० ऑगस्ट रोजी खेळला जाईल.

आशिया चषकासाठी बांगलादेश संघ-

शाकिब अल हसन (कर्णधार), अनामुल हक, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), अफिफ हुसैन, मोसद्दिक हुसैन, महमूदुल्लाह, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, शब्बीर रहमान, मेहदी हसन मिराज, परवेज हुसैन एमोन, तस्कीन अहमद और मोहम्मद नईम.

महत्त्वाच्या बातम्या-

भारत-पाकिस्तान महामुकाबल्यात ‘या’ पाच जणांत रंगणार ‘बॅटिंग बॅटल’

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ब्रेट ली म्हणतोय, ‘मला रिषभ पंतला गोलंदाजी करायचीये!’

फलंदाजांना सळो की पळो करून सोडायला एशियातील सर्वोत्तम ५ गोलंदाज सज्ज, वाचा संपूर्ण यादी

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---