ढाका। बांगलादेश विरुद्ध विंडिज संघात शुक्रवारपासून (30 डिसेंबर) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात क्रिकेटमधील दुर्मिळ गोष्ट पहायला मिळली आहे.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला त्यांच्या फलंदाजांनी योग्य ठरवताना पहिल्या डावात सर्वबाद 508 धावा केल्या आहेत.
विषेश म्हणजे त्यांच्या या डावात एकही फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झालेला नाही. संघातील सर्व 11 फलंदाजांनी किमान दोन आकडी धावसंख्या गाठली आहे.
एका डावात एका संघाच्या सर्व 11 फलंदाजांनी किमान दोन आकडी धावसंख्या गाठण्याची ही एकूण 14 वी वेळ आहे. तर बांगलादेश संघाच्या बाबतीत असे पहिल्यांदाच घडले आहे.
याआधी अशी शेवटची घटना जानेवारी 2016 मध्ये जाहार्न्सबर्ग येथे दक्षिण अफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात घडली होती. यावेळीही यजमान दक्षिण अफ्रिकेच्या संघातील सर्व 11 खेळाडूंनी पहिल्या डावात किमान दोन आकडी धावसंख्या पार केली होती.
14th instance of all XI batsman reaching double figures in an innings; first time @BCBtigers has done so. Last instance was by SA vs Eng in Joburg, 2015/16.
508 is the fifth highest total where all XI batsman reached double figures.#BANvWI pic.twitter.com/A0txmDcWx4— Deepu Narayanan (@deeputalks) December 1, 2018
त्याचबरोबर बांगलादेशची 508 ही धावसंख्या एखाद्या संघाच्या एका डावात सर्व 11 फलंदाजांनी किमान दोन आकडी धावसंख्या पार केल्यावर केलेली पाचव्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
मात्र या सामन्यात विंडीजची आवस्था मात्र बिकट आहे. त्यांनी पहिल्या डावात 16 षटकांच्या आतच 5 विकेट गमावल्या असून त्यांना 16 षटकांच्या आत 50 धावाही करता आलेल्या नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या:
–आज सचिनबरोबर १२ खेळाडूंनी केले होते एकाच सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण
–Video: कर्णधार विराट कोहलीने विकेट घेत केले असे जबरदस्त सेलिब्रेशन
–टी२० जागा न मिळालेल्या धोनीची या स्पर्धेत चमकदार कामगिरी
–आॅस्ट्रेलियात भारतीय सलामीवीरांची धमाकेदार कामगिरी