महिला आशिया चषक यंदा ऑक्टोबरमध्ये खेळवला जाणार आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये होणारी ही स्पर्धा १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. बांगलादेश या स्पर्धेच्या यजमानपदासाठी पूर्णपणे तयार आहे. प्रतिष्ठित ट्रॉफीसाठी एकूण ७ संघ एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) वेळापत्रक आणि इतर माहिती अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया आणि युएई, बांगलादेश व्यतिरिक्त ६ संघ असतील असे सांगण्यात येत आहे.
महिला टी-२० विश्वचषक पात्रता २०२२ नंतर ही स्पर्धा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात यूएईमध्ये सुरू होईल. यंदाच्या महिला आशिया चषक स्पर्धेसाठी आयसीसीने फ्युचर टूर्स प्रोग्राममध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे, याची माहिती गेल्या आठवड्यात देण्यात आली. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) महिला समितीचे अध्यक्ष शफीउल आलम चौधरी यांनीही क्रिकइन्फोला याची पुष्टी केली आहे.
कोविड-१९ महामारीमुळे ही स्पर्धा २०२० ऐवजी २०२१मध्ये आयोजित करण्यात आली होती. परिस्थिती बिघडल्यामुळे अखेर ही स्पर्धा रद्द करावी लागली. आता त्याचे पुनरागमन बांगलादेशकडून होणार आहे. महिला आशिया कप सहसा दर २ वर्षांनी आयोजित केला जातो, परंतु साथीच्या परिस्थितीमुळे वेळापत्रक कठीण झाले. २०१२ पासून ही स्पर्धा २० षटकांच्या स्वरूपात आयोजित केली जात आहे. सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम या स्पर्धेचे आयोजन करेल, ज्यामध्ये सामन्यांसाठी ग्राउंड-१ आणि सरावासाठी ग्राउंड-२ असेल.
चौधरी यांनी क्रिकइन्फोला सांगितले की, “सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे बीसीबी साठी सर्वोत्तम पर्याय आहे, विमानतळ आणि हॉटेल जवळ आहे, जिथे ७ संघ राहण्याची अपेक्षा आहेत.” सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे ग्राउंड-१ हे ठिकाण आहे जिथे आम्हाला महिला आशिया चषक सामन्यांचे आयोजन करायचे आहे आणि ग्राउंड-२ वर सराव होणार आहे.
ऑक्टोबर २०१८मध्ये पाकिस्तान दौऱ्यानंतर बांगलादेशने कोणत्याही महिला आंतरराष्ट्रीय संघाचे आयोजन केलेले नाही. यजमान म्हणून, बांगलादेशने यापूर्वी अनेक मोठ्या पुरुष आणि महिला क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे. यावर्षी, आमच्या देशात प्रथमच एसीसी महिला आशिया चषक स्पर्धेचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: हार्दिकच्या अंगात संचारला बुमराह! पंड्याने शेअर केलेल्या व्हिडिओवर ‘बुम-बुम’चा खास रिप्लाय
VIDEO: ‘शुबमनच्या शतकामागे युवराज सिंगचा हात!’ स्वत: गिलने सांगितले गुपित
Asia CUP: ‘भारत-पाकिस्तान सामन्याची वेळ, ठिकाण अन् थेट प्रक्षेपण!’ जाणून घ्या सगळं काही एका क्लिकवर