बांगलादेशचा जलदगती गोलंदाज मुस्ताफिजुर रेहमान अफगाणिस्तान विरूध्दच्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतून पायाच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर झाला.
मुस्ताफिजुर मुंबई इंडियन्सकडून मागील आठवड्यात आयपीएल खेळून मायदेशी परतला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सरावासाठी दाखल होण्यापुर्वीच त्याला त्रास जाणवू लागला.
आयपीएल दरम्यान त्याच्या डाव्या पायाचा अंगठा दुखावला होता. मुस्ताफिजुरला पुर्ण तंदुरूस्त होण्यासाठी तीन आठवडे विश्रांतीची गरज आहे असे बांगलादेश संघाचे फिजीओ देबशीष चौधरी म्हणाले.
अफगाणिस्तान विरूध्दची तीन टी20 सामन्यांची मालिका 3,5 आणि 7 जुन रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम देहराडून येथे होणार आहे.
अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांचे मायदेशातील सामने बीसीसीआयच्या मदतीने भारतात आयोजित केले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–या मोठ्या सामन्यासाठी हार्दिक पंड्याच्या जागी मोहम्मद शमीला दिली संधी
-क्रिकेटर अजिंक्य रहाणेसारखा सकारात्मक हवा! वाचा का?
–अशी आहे अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडिया
–डेविड वॉर्नर-बॅनक्रॉफ्ट पुनरागमनाठी सज्ज
-तो स्क्रिनशाॅट पाहिल्यावर नक्की काय करावे सुचत नव्हते- राशिद खान
–ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज
–चेतेश्वर पुजाराने इंग्लंड गाजवले, वनडेत पुन्हा एक तुफानी फटकेबाजी