राजस्थान रॉयल्सचा संघ मालक राज कुंद्रा एक नवीन लीग घेऊन आपल्या भेटीला येत आहे, त्याचे नाव आहे ‘इंडियन पोकर लीग’. या प्रसंगी कुंद्रा म्हणाला की ही भारतासाठी विश्वस्थरावर पोकेर मध्ये आपले नाव करण्याची उत्तम संधी आहे.
या नवीन लीग बरोबरच त्याला मूळ आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग बद्दल देखील विचारण्यात आले त्यावेळी त्याने आपण आता या आयपीएलवर लक्ष जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत असे सांगितले.
“आयपीएलपासून मी फार लांब राहू शकलो नाही म्हणून परत आलो, आयपीएल घेऊन पण वेगळ्या रूपात.” राज कुंद्राचे हे शब्द नुक्यातच एका नवीन लीगच्या उद्घाटनाप्रसंगी समोर आले.
या लीगमध्ये विजयी होणारा संघ पोकर विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करेल. या लीगला आंतराष्ट्रीय पोकर संघटनेची मान्यता असून त्यामुळेच ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या नेशन्स कपमध्ये भारताला संधी मिळणार आहे.
या लीगला ऑक्टोबरमध्ये सुरवात होणार असून दोन दिवसाची ही स्पर्धा मुंबईमध्ये होणार आहे. राज कुंद्राने याअगोदर आयपीएलचा संघ मालक, सुपर फाईट लीगची सुरवात आणि कल्पना राबवली होती.