इंग्लंड क्रिकेट संघाचे दिग्गज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. कारण, त्यांचे योगदान जवळपास प्रत्येक क्रिकेटप्रेमी जाणतो. मागच्या काही महिन्यांपूर्वी या दोघांना इंग्लंडच्या कसोटी संघातून वगळले गेले होते, पण आता त्यांनी संघात पुनरागमन केले आहे. याच पार्श्वभूमीवर कॅरेबियन प्रीमियर लीगचा संघ बार्बाडोस रॉयल्सने एक मजेशीर ट्वीट केले, जे चांगलेच व्हायरल देखील झाले.
जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) हे दोन्ही गोलंदाज इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज आहेत. दोघांनी मोठ्या काळापासून इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे आणि आज देखील संघात कायम आहेत. त्यांच्या मोठ्या कारकिर्दीची चर्चा नेहमीच होत असते. आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांना पुन्हा इंग्लंड संघात सामील केले गेल्यामुळे देखील या चर्चांना उधाण आले आहे.
Year 2053 and these two will still be troubling batters! 😂
Absolute legends. 🤌👏#ENGvNZ pic.twitter.com/mvG5XjuK0h
— Barbados Royals (@BarbadosRoyals) June 2, 2022
गुरुवारी (२ जून) बार्बाडोस रॉयल्सने अँडरसन आणि ब्रॉड या जोडीविषयी मजेशीर ट्वीट शेअर केले. कॅरेबियन प्रीमियर लीगच्या या फ्रँचायझीने जे ट्वीट केले, त्यामध्ये अँडरनस आणि ब्रॉड दोघेही म्हातारे झाल्याचे दिसत आहेत. ट्वीटमध्ये असा उल्लेख केला गेला आहे की, २०५३ मध्ये देखील हे दोघे अशाच पद्धतीने विरोधी संघातील फलंदाजांना बाधा निर्माण करतील. आजच्या हिशोबाने २०५३मध्ये अँडरसन ७० वर्षाचा असेल, तर ब्रॉडचे वय ६६ वर्ष असेल. सध्या अँडरसन ३९ वर्षांचा, तर ब्रॉड ३५ वर्षांचा आहे. बार्बाडोस रॉयल्सने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “वर्ष २०५३ आहे आणि हे दोघे तेव्हा देखील फलंदाजांच्या अडचणी वाढवत असतील. दिग्गज!”
दरम्यान, कसोटी संघात पुनरागमन करताच या दोघांनी स्वतःची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पोहिल्याच दिवशी अँडरसनने ४ विकेट्स घेतल्या, तर ब्रॉडला देखील एक विकेट मिळाली. न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा पहिला डाव अवघ्या १३२ धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ देखील पहिल्या डावात स्वस्तात बाद झाला. १४१ धावांवर इंग्लंडचा संपूर्ण संघ गुंडाळला गेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या युवा गोलंदाजाने फेकला ‘हेल्मेट तोड’ खतरनाक बाऊंसर, व्हिडिओ पाहून तुमचाही उडेल थरकाप
आधी फास्ट बॉलर, मग स्पिनर आणि आता बॅटर म्हणून नाव कमावलेला आरसीबीचा रजत पाटीदार
लॉर्ड्स कसोटीत फेल ठरूनही जो रूट बनला ‘विक्रमवीर’, सचिन, द्रविड, कूकच्या खास क्लबमध्ये दाखल