---Advertisement---

INDvsBAR: ‘करा वा मरा’ लढतीसाठी भारत सज्ज, ‘या’ गोलंदाजाचे पुनरागमन; पाहा प्लेइंग इलेव्हन

Harmanpreet-Kaur-Barbados-Captain
---Advertisement---

बुधवारी (०३ ऑगस्ट) कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये भारत विरुद्ध बार्बाडोस यांच्यात करा अथवा मराची लढत रंगणार आहे. उभय संघांनी आतापर्यंत २ सामने खेळले असून त्यापैकी १ सामना जिंकला आहे. अशात आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना हा सामना जिंकावा लागणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १०.०० वाजता नाणेफेक झाली आहे. बार्बाडोस संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

बार्बाडोस संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक प्रमुख बदल करण्यात आला आहे. तर भारतीय संघातही वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकार हिचे पुनरागमन झाले आहे. कोविड-१९ संक्रमणामुळे ती साखळी फेरीतील पहिल्या २ सामन्यांना मुकली होती. तसेच यष्टीरक्षक यस्तिका भाटियाच्या जागी तानिया भाटियाला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली आहे.

असे आहेत दोन्ही संघ-

भारतीय महिला संघ:
शेफाली वर्मा, स्म्रीती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा, मेघना सिंग, रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर

बार्बाडोस महिला संघ:
डिएंड्रा डॉटिन, हिली मॅथ्यूज (कर्णधार), कायसिया नाइट (यष्टीरक्षक), किशोना नाइट, आलिया ऍलेने, त्रिशन होल्डर, अलिसा स्कॅंटलबरी, शकेरा सेलमन, शमिलिया कोनेल, शॉन्टे कॅरिंग्टन, शनिका ब्रूस

दरम्यान गट अ मधून ऑस्ट्रेलिया आणि गट ब मधून इंग्लंड व न्यूझीलंड संघ यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीतील चौथ्या स्थानाचा दावेदार भारत आणि बार्बाडोस संघातील सामना निकालावर अवलंबून असेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

चौथी टी२०| दुखापतग्रस्त रोहितच्या अनुपस्थितीत ‘हे’ तिघे आहेत भारताचे प्रभारी कर्णधार बनण्याचे दावेदार

एशिया कप जिंकण्यासाठी कर्णधार रोहित लावणार जोर, असा असू शकतो तगडा भारतीय संघ

आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी मुरिएल पुणे संघाची कर्णधार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---