बार्सिलोनाचा माजी स्टार खेळाडू नेमार जुनिअरने आपला नवीन संघ पॅरिस सेंट जर्मनला पहिल्या सामन्यात गोल करत विजय मिळवून दिला. मात्र त्याच्या माजी संघाची अवस्था काही फारशी बारी नाही असे दिसून येते.
स्पॅनिश सुपर कपचा पहिला सामना रिआल माद्रिद विरुद्ध झाला. या सामन्यात बार्सिलोनाला ३-१ असा पराभव सहन करावा लागला होता. बार्सिलोना संघाला केवळ एक गोल करता आला आणि तो लिओनेल मेस्सीने केला. नेमारचे बार्सिलोनामधून जाणे संघाला किती नुकसान करू शकते हे पहिल्या सामन्यात दिसले असे मत बार्सिलोनाचा डिफेन्सिव्ह मिडफिएल्डर सर्जिओ बुस्केट्स मांडले. नेमार काय दर्जाचा खेळाडू आहे हे आपल्याला कळणे गरजेचे आहे.
स्पॅनिश सुपर कपचा पुढचा सामना बार्सिलोनासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे आणि त्यात विजय मिळवण्यासाठी बार्सिलोना उत्सुक असेल. मात्र नेमार नसल्यामुळे त्यांचा अटॅक कमी पडतो आहे. अजूनही सर्वोत्तम खेळाडूच्या शोधात आहोत आणि ते संघात येऊ शकतात असे संघ व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
नेमारनंतर बार्सिलोनाने ब्राझीलचा मिडफिल्डर पॉलिनो याला आपल्या संघात घेतले आहे. मात्र नेमारसारख्या खेळाडूला पुनर्स्थित करणे ही काही सोपी गोष्ट नाही.