---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : सांघिक कामगिरीच्या बळावर बडोदा बाद फेरीत, गुजरातचा केला पराभव

---Advertisement---

कोरोनानंतर भारतात पहिल्यांदाच स्थानिक क्रिकेटला सुरुवात झाली असून, सध्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीचा थरार सुरू आहे. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून प्रत्येक सामन्यात उत्तम संघर्ष बघायला मिळत आहे. नुकत्याच ग्रुप सीच्या पार पडलेल्या सामन्यात बडोदा संघाने गुजरातचा 12 धावांनी पराभव करत बाद फेरी गाठली आहे. विशेष म्हणजे बडोदा संघाचा हा सलग 5 सामन्यातील पाचवा विजय आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून बडोदा संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात बडोदा संघाने विष्णू सोलंकीच्या नाबाद 59 धावांच्या खेळीमुळे 4 गडी गमावत 179 धावांपर्यंत मजल मारली होती.

या लक्ष्याचा पाठलाग करताना यष्टीरक्षक ध्रुव रावलने 27 चेंडूत 41 धावा करत गुजरातला आक्रमक सुरुवात मिळवून दिली. रावल बाद झाल्यानंतर कर्णधार अक्षर पटेलने आक्रमक 36 धावांची खेळी करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र अखेरच्या षटकांत संघाने 5 चेंडूमध्ये 4 विकेट गमावल्या. येथून संघाचा विजय अशक्य झाला होता.

या पराभवामुळे गुजरात संघ बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. त्याचवेळी बडोद्याने या विजयासह बाद फेरीत प्रवेश केला आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये बडोदा संघ आत्मविश्‍वासाने खेळत असून, त्यांना विजेतेपद मिळवण्याची मोठी संधी आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कर्णधार कृणाल पांड्या व उपकर्णधार दीपक हुड्डा मध्ये वाद झाला होता. या वादाच्या दबावाला झुगारत संघाने उत्तम कामगिरी केल्याने सर्व क्रिकेट रसिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

ऑस्ट्रेलियाने डाव लवकर घोषित करायला हवा होता, माजी ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी केली टीका

ब्रिस्बेन टेस्ट : भारत विजयी झाल्यास कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लागणार सुरुंग! जाणून घ्या

व्वा काय डोकं चालवलंय! चेंडू चमकवण्यासाठी मयंकने शार्दुलच्या हातावर घासला चेंडू, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---