विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात नेदर्लंड्सच्या गोलंदाजांना चमकदार कामगिरी केली. वनडे विश्वचषक 2023 मधीला हा दुसरा सामना असून हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि नेदर्लंड संघ आमने सामने होते. बास डी लीडे या या सामन्यात सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. एका खास यादीत त्याने आपले स्थान देखील पक्के केले.
पाकिस्तान आणि नेदर्लंड्स (PAK vs NED) यांच्याती या सामन्याची नाणेफेक नेदर्लंडने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला पाकिस्तान संघ 49 षटकांमध्ये 286 धावा करून सर्वबाद झाला. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी प्रत्येकी 68-68 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे नेदर्लंड्ससाठी बास डी लीडे (Bas de Leede) याने 9 षटकांमध्ये 62 धावा खर्च करून 4 विकेट्स घेतल्या.
नेदर्लंड्ससाठी वनडे विश्वचषकात हे एकाद्या गोलंदाजाचे चौथे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले. विश्वचषकात नेदर्लंड्ससाठी सर्वोत्तम प्रदर्शन बास डी लीडे याचे वडिल टिम डी लीडे (Tim de Leede) यांनी 2003 साली केले होते. यादीत दुसऱ्या क्रमांकावर फीको क्लोपेनबगे (Feiko Kloppenburg), तर तिसऱ्या क्रमांकावर आदिल राजा (Adeel Raja) याचे नाव आहे. (Bas de Leede, who took four wickets against Pakistan, joined the special list)
नेदर्लंड्ससाठी विश्वचषक सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करणारे गोलंदाज
4/35 – टिम डी लीडे विरुद्ध भारत (2003)
4/42 – फीको क्लोपेनबगे विरुद्ध नामिबिया (2003)
4/42 – आदिल राजा विरुद्ध नामिबिया (2003)
4/62 – बास डी लीडे विरुद्ध पाकिस्तान (2023)
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन – इमाम-उल-हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ
नेदरलँड्सची प्लेइंग इलेव्हन – विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीड, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन